Monday, January 19, 2026
Home बॉलीवूड ‘माझ्या मुलाने माझ्यासारखं न वागता…’, तर शाहरुखला आर्यनकडून होत्या ‘अशा’ विचित्र अपेक्षा

‘माझ्या मुलाने माझ्यासारखं न वागता…’, तर शाहरुखला आर्यनकडून होत्या ‘अशा’ विचित्र अपेक्षा

बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या अमली पदार्थांप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सर्वांची सुरुवात नेमकी कुठून झाली, तसेच आर्यनचा यामध्ये किती सहभाग आहे आणि त्याचे खासगी आयुष्य नेमके कसे आहे, या सर्वांविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

तर मंडळी आतापर्यंत तुम्ही आर्यन खानला एनसीबीने अमली पदार्थांप्रकरणी ताब्यात घेतल्याचे वृत्त वाचलेच असेल. अशात या सर्वांची सुरुवात ही त्याच्या जन्मापासूनच झाली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसे काय बरे? तर तुमच्या माहिती साठी सांगूयात की, साल १९९७ मध्ये आर्यन खानचे आई वडील म्हणजेच अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान सिमी ग्रेवाल यांच्या एका टॉप शोमध्ये पोहचले होते. (father shahrukh khan expect these things from son aryan khan )

त्यावेळी त्यांना सिमी यांनी त्यांच्या मुलांच्या संस्काराविषयी एक प्रश्न विचारला होता. तेव्हा नेहमीच आपल्या हटके अंदाजात उत्तर देणारा बॉलिवूडचा बादशाह असे म्हणाला होता की, “मला असं वाटतं माझ्या मुलाने माझ्या सारखं नसावं. मी माझ्या आयुष्यात जे काही करू शकलो नाही ते सर्व काही त्यानं करावं. तसेच त्याने ड्रग्स घ्यावेत, खूप सेक्स करावं तो जेवढ्या लवकर हे काम सुरू करेल तेवढं चांगल आहे. ज्यांच्या मुलींबरोबर तो असे करेल त्यांनी माझ्याकडे त्याची तक्रार घेऊन यायला पाहिजे.” शाहरुख खानच्या या वक्तव्यावर तेव्हा शोमध्ये हशा पिकला होता. परंतु त्याचे परिणाम आता दिसत आहेत. तो या शोमध्ये गेला होता तेव्हाच आर्यन खानचा जन्म झाला होता. आता आर्यन २३ वर्षांचा आहे.

 

आर्यनला २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने आमली पदार्थांप्रकरणी ताब्यात घेतले. मुंबईमधील एका क्रूज शीपवर जंगी पार्टी सुरू होती. त्यावेळी तेथे एनसीबीची टीम पोहोचली. त्यांना तिथे अमली पदार्थ सापडले. सध्या आर्यनची चौकशी सुरू आहे.

आर्यनचा जन्म १३ नोव्हेंबर १९९७ रोजी मुंबईमध्ये झाला. त्याने साऊथ कॅलिफोर्निया यूनिवर्सिटीमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साल २००१ मध्ये आलेल्या चित्रपट ‘कभी खुशी कभी गम’ मध्ये तो झळकला होता. तसेच ॲनिमेटेड चित्रपट ‘द इन्क्रेडिबल’मध्ये त्याने डबिंग केले आहे. साल २०१९मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘द लॉयन किंग’मधील सिंबा या पात्राला त्याने स्वतःचा आवाज देखील दिला आहे.

टायकोंडोमध्ये देखील तो चॅम्पियन आहे. साल २०१० मध्ये त्याने टायकोंडोमध्ये सुवर्णपदक पटकावले. तसेच मार्शल आर्ट्समध्ये त्याला ब्लॅक बेल्ट मिळाला आहे. ‘द इन्क्रेडिबल’ या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट डबिंगचा पुरस्कार देखील देण्यात आला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप

-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ

हे देखील वाचा