Saturday, March 2, 2024

‘सॅम बहादुर’मध्ये इंदीरा गांधीच्या भुमिकेसाठी फातिमाने दिला होता नकार, जाणुन घ्या संपुर्ण माहिती

‘चाची 420’ चित्रपटातुन इंडस्ट्रीत पाऊल टाकणारी आणि ‘दंगल’ चित्रपटातुन स्वतःची ‘दंगल गर्ल’ अशी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री फातिमा सना शेख, तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सॅम बहादूर’ चित्रपटात ती दिसली होती. या चित्रपटात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. नुकत्याच झालेल्या एका संवादादरम्यान फातिमाने खुलासा केला की तिने सुरुवातीला हे पात्र करण्यास नकार दिला होता. यावळी तिने याव्यतिरीक्तही अनेक खुलासे केले आहेत.

इंदिरा गांधींची भुमिकेसाठी दिला होता नकार
फातिमा सना शेखने (Fatima sana shaikh )सांगितले की, तिने सुरुवातीला ही भूमिका नाकारली होती. ती म्हणाली, ‘मला हे पात्र करायचे नव्हते कारण मला वाटलं नव्हतं की मी इंदिरा गांधींची भूमिका करू शकेल. दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी मला हे पात्र साकारण्यासाठी मी राजी केलं आणि मी हे पात्र उत्तमपणे करु शकते हे पटवून दिलं. त्यांचा विश्वास पाहून मी हे पात्र साकारले. आणि विशेष म्हणजे या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांकडून दादही मिळाली.

सॅम बहादूरच्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले तर, फातिमा व्यतिरिक्त विकी कौशल (Vicky Kaushal )आणि सान्या मल्होत्रा( Sanya Malohtra) देखील ‘सॅम बहादूर’मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षी 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाशी टक्कर झाली. परंतु तरीही ॲनिमलला बॉक्स ऑफिसवर टक्कर देत हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. सॅम बहादूरचे(Sam Bahadur) बॉक्स ऑफिसवरही चांगलेच कलेक्शन होते.

फातिमा सना शेख हिचं वर्कफ्रंट
फातिमा सना शेखने 1997मध्ये ‘चाची 420’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटात अभिनेत्रीने बालकलाकार म्हणुन भारतीची भूमिका साकारली होती. यानंतर 2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘दंगल’ चित्रपटात फातिमा पुन्हा पडद्यावर दिसली. या चित्रपटात अभिनेत्रीने आमिर खानसोबत काम केले. दंगलनंतर फातिमाने ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’, ‘लुडो’, ‘सूरज पर मंगल भारी’, ‘अजीब दास्तान’ यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

हे देखील वाचा