Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड नोरा फतेहीकडून तिरंग्याचा अपमान! फिफा वर्ल्डकपमध्ये काय केलं पाहाच

नोरा फतेहीकडून तिरंग्याचा अपमान! फिफा वर्ल्डकपमध्ये काय केलं पाहाच

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री नोरा फतेही हिने अलीकडेच फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये तिचा परफॉर्मन्स दिला. यावेळी अभिनेत्री खूप उत्साही दिसली आणि स्टेजवर जल्लोष करताना हातात तिरंगा घेऊन जय हिंदचा नारा देतानाही दिसली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, तिच्या एका चुकीमुळे नाेरा सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे.

एका फॅन पेजने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नोरा फतेही (nora fatehi) लोकांच्या गर्दिने भरलेल्या स्टेडियममध्ये स्टेजवर हातात तिरंगा घेऊन जय हिंदचा नारा देत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि यावेळी उपस्थित लोकांनी उत्साहाने भारताचा जयघोषही केला. यादरम्यान नोरा म्हणते, “भारत फिफा वर्ल्ड कपमध्ये नसला, तरी आम्ही या फेस्टमध्ये उपस्थित आहोत.” आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि युजर्स नोरा फतेहीला चांगलेच ट्राेल करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arshin k madhu (@arshin_k_madhu)

सर्वप्रथम, व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, कोणीतरी मंचावर उपस्थित नोरा फतेहीला तिरंगा देत आहे आणि त्यादरम्यान राष्ट्रध्वज मंचावर पडतो. यानंतर, अभिनेत्री तिरंगा फडकावण्यास सुरुवात करते, परंतु यादरम्यान ती चुकीच्या पद्धतीने झेंडा पकडते. आता या चुकीमुळे लोक सोशल मीडियावर तिचा क्लास लावताना दिसत आहेत.

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने आपली प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, “तिरंगा चुकीचा पकडला गेला आहे.” तर  दुसऱ्याने कमेंट करत लिहिले, “तिरंगा अत्यंत चुकीच्या पद्धतीने देण्यात आला. हा तिरंग्याचा अपमान आहे.” त्याचवेळी आणखी एका व्यक्तीने लिहिले, ” तिला तिरंगा कसा फडकावायचा हे देखील कळत नाही, ते हिरव्यापासून केशरीपर्यंत लहरत आहे..किती लज्जास्पद”. इतरही युजर्स अशाच प्रकारे कमेंट करत नाेराला ट्राेल करत आहे. (fifa world cup 2022 bollywood dancer nora fatehi gets trolled for holding national flag wrong way)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
कार्तिकच्या आधी वरुणला आलेली ‘हेरा फेरी 3’ची ऑफर, पण ‘या’ कारणास्तव दिला नकार

‘ज्या वयात मुलं खेळायची, माझा मुलगा इंजेक्शन मोजायचा’, कँसरग्रस्त मुलाचे हाल ऐकून अमिताभही भावूक

हे देखील वाचा