Monday, June 17, 2024

कार्तिकच्या आधी वरुणला आलेली ‘हेरा फेरी 3’ची ऑफर, पण ‘या’ कारणास्तव दिला नकार

बाॅलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून ‘हेरा फेरी 3‘ चांगलाच चर्चेत आहे. अक्षय कुमार याने चित्रपटातून एक्झिट केल्यानंतर हा चित्रपट चर्चेचा विषय बनला होता. या चित्रपटात कार्तिक आर्यन याच्या एंट्रीने खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर काहींनी याबद्दल नाराजी व्यक्त केली, तर काहींनी त्याचे कौतुक केले. मात्र, तुम्हाला माहित आहे का? या चित्रपटासाठी कार्तिकच्या पहिले वरुण धवनला ऑफर करण्यात आले हाेते. मग असे काय झाले की, अभिनेत्याने चित्रपटाला नकार दिला? काय आहे कारण चला जाणून घेऊया…

माध्यमातील वृत्तानुसार, वरुण धवन (varun dhawan) याच्यासाठी ही ऑफर खूपच आकर्षक होती, परंतु अक्षय कुमार (akshay kumar) याने तयार केलेल्या फ्रेंचायझीमध्ये त्याला उडी मारायची नव्हती. त्याला अक्षय कुमारबद्दल प्रचंड आदर आहे. ‘हेरा फेरी 3’ (hera pheri 3) नक्कीच ब्लॉकबस्टर आहे, परंतु वरुणने अक्षयचा आदर करत चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

माध्यमातील वृत्तानुसार, असा दावा करण्यात आला होता की, अक्षयने हेरा फेरी फ्रँचायझीमधील तिसऱ्या चित्रपटातून माघार घेतली आहे. खुद्द अभिनेत्याने एका कार्यक्रमात याची पुष्टी केली. अक्षय कुमार म्हणाला, “मला चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती, पण मी स्क्रिप्टवर समाधानी नव्हतो. लोकांना जे पाहायचे आहे तेच मला करायचे आहे. म्हणूनच मी एक पाऊल मागे घेतले.”

अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल आणि तब्बू यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘हेरा फेरी’ चित्रपट 2000 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले हाेते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 18 कोटींची दमदार कमाई केली. ‘फिर हेरा फेरी’चा सिक्वेल दिवंगत नीरज व्होरा यांनी दिग्दर्शित केला होता. 2006 मध्ये आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 69 कोटींची कमाई केली होती. (hera pheri 3 producers had approached to actor varun dhawan before giving offer to actor kartik aaryan)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
अशनीर ग्रोवरची बिग बाॅसवर जहरी टिका; म्हणाला, ‘अयशस्वी लोकांचा शो’

बापलेकाची जोडी सुसाट! मुलगा आझादसोबत थिरकला आमिर खान, व्हिडिओ जोरदार व्हायरल

हे देखील वाचा