Saturday, March 2, 2024

विषारी किड्याला स्पर्श केल्याने ‘या’ ऍक्टरला आला हार्ट ऍटॅक, आलिया भट्टसोबतही केलेलं काम

सध्याला सेलिब्रिटिंमधील हार्ट ऍटॅकच्या बातम्या नेहमीच समोर येताना दिसतात.पण एखाद्या किड्याचा स्पर्श झाल्याने कोणाला हार्ट ऍटॅक आलेला तुम्ही कधी असं ऐकलंय का?. पण असा एक विषारी किडा आहे ज्याला स्पर्श केल्याने हार्ट ऍटॅक येतो. नुकतेच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या संबंधी अशी बातमी समोर आली आहे. जे ऐकुन सर्वचजण चकीत झाले आहेत. एका ऍक्टरला पोर्तुगाल ट्रिपदरम्यान एका विषारी किड्याला स्पर्श केल्याने हार्ट ऍटॅक आला आहे. त्यानंतर त्याला हाॅस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलतोय तो आहे, ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे‘मध्ये(Fifty shades of grey) मुख्य भुमिका साकारणारा जेमी डॉर्नन ज्याच्यासोबत हे गोष्ट घडली आहे.

जेमाच्या आधी त्याच्या मित्राला आला हार्ट ऍटॅक
सांगितलं जातंय की, त्याच्यासोबत जेव्हा ही घटना घडली तेव्हा ऍक्टर पोर्तुगाल ट्रिपवर होता. जेमी डॉर्ननचा मित्र गॉर्डन स्मार्टने या संपुर्ण घटनेबद्दल एका इंटरव्यूमध्ये बोलताना सांगितलं की, तो आणि जेमी दोघंही पोर्तुगालच्या गोल्फिंग रिसाॅर्टमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होते. दरम्यान अचानक त्याची तब्बेत खराब व्हायला लागली. सुरुवातीला जेव्हा त्याला त्रास व्हायला लागला तेव्हा त्याने विचार केला की त्याने जास्त ड्रिंक घेतली आहे. त्यामुळे त्याला एसा त्रास होत आहे. परंतु नंतर त्याच्या लक्षात आले की, त्याला हे सर्व एका फुलपाखरामुळे होत आहे. जो विषारी असते.

मित्र बरा झाल्यावर जेमी डॉर्नन झाला दवाखान्यात भरती
गॉर्डन स्मार्टने सांगितलं की,ट्रिपच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्यासोबत ही घटना घडली. त्यानंतर अचानक त्याच्या डाव्या हातात मुंग्या आल्यासारखे जाणवले. त्यानंतर त्याला कळाले की त्याला हार्ट ऍटॅक येत आहे. त्यानंतर गॉर्डन स्मार्टला लगेच दवाखान्यात ऍडमिट केलं आणु नंतर त्याला डिसचार्जदेखील मिळाला.
तो जेव्हा हाॅटेलला पोहोचला तेव्हा पाहिले की,जेमी डोर्ननला(Jamie dornan) देखील तोच त्रास होत आहे.स्मार्टने याबाबतीत सांगितले की,’जेमीने याबद्दल सांगितले की,त्याच्या दवाखान्यात भरती होण्याच्या 20-25 मिनिटांनी जेमीचे हात-पायही सुन्न पडायला लागले होते. त्यानंतर त्यालाही लगेच दवाखान्यात भरती करावे लागले. पण आनंदाची गोष्ट ही आहे की जेमी आणि गॉर्डन दोघांचीही तब्बेत आता ठीक आहे. ‘

हे देखील वाचा