आजपर्यंत आपण अनेक कलाकारांच्या जीवनावर आधारीत बायोपिक बनवलेले पाहिले आहे. जसे की, सचिन तेंडुलकर, मिल्खा सिंग, एमएस धोनी, नीरजा, पान सिंग तोमर. यांसारख्या बऱ्याच चित्रपटांना पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे. यामध्ये आणखी एका मराठी चित्रपटाचाही समावेश झाला आहे.
सोमवारी (२२ मार्च) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. यामध्ये ‘लता भगवान करे: एक संघर्षगाथा’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा चित्रपट बारामतीच्या ६६ वर्षीय वृद्ध स्त्री लता भगवान करे यांच्या जीवनसंघर्षावर बनवण्यात आला आहे.
लता यांचे मूळ गाव हे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर हे आहे. त्यांनी अतोनात कष्ट करून आपल्या तिन्ही मुलींचे लग्न केले. त्यांच्या संघर्षमय जीवनावरील या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे आता सर्व क्षेत्रांतून त्यांच्यावर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.
हा चित्रपट नवीन देशबोईना यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट लता करे यांच्या सत्य घटनेवर आधारित आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात लता यांची प्रमुख भूमिका आहे. याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती म्हणजेच त्यांचे पती भगवान करे आणि मुलगा सुनील करे यांच्याही यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्यादेखील त्यांनीच निभावल्या आहेत.
याव्यतिरिक्त चित्रपटात रेखा गायकवाड, राधा चव्हाण, साक्षी साबळे आणि अजय शिंदे यांच्यादेखील भूमिका आहेत. चित्रपटाला प्रशांत महामुनी यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट मागील वर्षी १७ जानेवारी, २०२० रोजी प्रदर्शित झाला होता.
काय आहे कथा?
मूळच्या मेहकरच्या असलेल्या लता करे या कामाच्या शोधात बारामतीमध्ये आल्या होत्या. त्यांचे पती भगवान हे हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांचा उपचार करण्यासाठी त्या पैशांची जमवाजमव करण्याचा शोध घेत असतात. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केलेले असते. यामध्ये त्या भाग घेतात आणि चक्क नऊवारी साडी नेसलेल्या आजीबाई थंडीच्या दिवसात पायात काहीही नसताना धावतात. यामध्ये त्या अव्वल येतात. आणि सलग ३ वर्षे ही स्पर्धा जिंकतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पांढऱ्या रंगाच्या चादरमध्ये ‘ही’ अभिनेत्री दिसली टॉपलेस, फोटो शेअर करत म्हणतेय ‘वो पहला प्यार’
-विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? अभिनेत्याने केली मोठी घोषणा










