म्हैसूरमध्ये ‘पेड्डी’ चित्रपटाचे चित्रीकरण वेगाने सुरू होते. पण अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) आजीच्या निधनामुळे, अभिनेता राम चरण यांनी त्यांच्या ‘पेड्डी’ चित्रपटाचे चित्रीकरण काही काळासाठी थांबवले. अल्लू अर्जुन आणि राम चरण हे खऱ्या आयुष्यात जवळचे नातेवाईक आहेत. या घडामोडीदरम्यान, राम चरण यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचीही भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या भेटीबाबत सोशल मीडियावर एक ट्विट देखील शेअर केले आहे.
राम चरण आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राम चरण मुख्यमंत्र्यांना फुलांचा गुच्छ भेट देताना दिसले. राम चरण मुख्यमंत्र्यांशी बोलतानाही दिसले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर राम चरण यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ते लिहितात, ‘आज म्हैसूरमध्ये तेलुगू अभिनेता राम चरण यांची भेट झाली, त्यांच्याशी बराच वेळ चर्चा झाली. ते सध्या ‘पेड्डी’ चित्रपटाचे शूटिंग करत आहेत.’ राम चरण यांनीही ट्विटरवर पोस्ट करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे आभार मानले. ते त्यांच्या ट्विटमध्ये लिहितात, ‘धन्यवाद साहेब, कर्नाटकात शूटिंग करणे नेहमीच आनंददायी असते. तुम्हाला भेटणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.’
‘पेड्डी’ चित्रपटात राम चरणसोबत बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरही दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता जगपती बाबू देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट बुची बाबू सना दिग्दर्शित करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
प्रिया मराठेच्या मृत्यूने दुःखी झाल्या उषा नाडकर्णी; व्यक्त केले दुःख










