‘सालार’चे दिग्दर्शक प्रशांत नील यांना ‘बाहुबली’ स्टार प्रभास याच्यासोबत काम करताना कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. प्रभास ‘सालार’ सोडून इतर चित्रपटांकडे जास्त लक्ष देत असल्याचे बोलले जात आहे. प्रभास इतर चित्रपटांमध्ये काम करण्यात व्यस्त आहे. यावेळी त्याने फक्त सालारवर लक्ष केंद्रित करावे, असे प्रशांत यांना वाटते.
‘बाहुबली’ स्टार प्रभासच्या (Prabhas) ‘सालार’ (Salar) या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान अनेक अडथळे येत आहेत. वृत्तांनुसार, ‘सालार’ दिग्दर्शक प्रशांत नील अभिनेता प्रभासवर नाराज आहेत. प्रभासने इतर प्रोजेक्ट्सकडे जास्त लक्ष दिल्याने त्यांना अडचण येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, प्रशांत नील यांनी असे म्हटले आहे की, तो त्याचे काम गांभीर्याने घेतो. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो कोणताही विनोद किंवा मूर्खपणा करत नाही. जेव्हा गोष्टी प्लॅननुसार होतात, तेव्हा त्या ठीक असतात नाहीतर त्यांची मज्जा येत नाही. प्रशांत नीलला सर्व गोष्टी व्यवस्थित पाहिजेत. प्रभास त्यांच्या या पर्फेक्शनिस्ट स्वभावात बसत नसल्याचे दिसते.
रिपोर्टनुसार, प्रभाससोबत काम करताना प्रशांत नील यांना कठीण प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. प्रभास सालार सोडून इतर चित्रपटांकडे जास्त लक्ष देतोय. तो इतर चित्रपटांमध्ये काम करण्यात व्यस्त आहे. ही गोष्ट प्रशांत नीलला सतावत आहे. असे देखील बोलले जात आहे की, प्रभासच्या लूक आणि त्याच्या अभिनयावर प्रशांत फारसे खुश नाहीयेत. प्रभासचे अनेक बॅक टू बॅक सिनेमे आहेत आणि प्रत्येक चित्रपटात त्याचा वेगळा लूक असल्याने त्याचा परिणाम ‘सालार’मधील त्याच्या ऑनस्क्रीन लूकवर होत आहे. यावेळी प्रभासने फक्त सालारवर लक्ष केंद्रित करावे, अशी प्रशांत यांची इच्छा आहे.
View this post on Instagram
प्रभासचा दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिच्यासोबत ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. ‘आदिपुरुष’मध्ये प्रभाससोबत क्रिती सेनन आणि सैफ अली खानदेखील दिसणार आहेत. ‘बाहुबली 2’ नंतर प्रभासचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले, पण हे दोन्ही सिनेमे अपयशी ठरले आहेत. ‘साहो’नंतर ‘राधे श्याम’चीही बॉक्स ऑफिसवर वाईट स्थिती होती. प्रभास ‘सालार’सोबत पुनरागमन करण्यास सक्षम आहे की नाही, हे पाहावे लागेल. पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात आलियाने केला ‘चिकनी चमेली’वर डान्स; नेटकरी म्हणाले, ‘माफी मागा कॅटरिनाची’
सुनील शेट्टीने ‘हेरा फेरी’ अंदाजात अक्षयला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’
शुबमन गिलच्या मित्राने फोडलं भांडं! वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना घेतलं ‘सारा’चं नाव; पण चाहते गोंधळात