बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन याने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 2000 साली ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या ऋतिकने ‘जोधा अकबर’, ‘सुपर 30’, ‘काबिल’, ‘धूम’ आणि ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या चाहत्यांना प्रभावित केले आहे. ऋतिक रोशन सध्या त्याच्या आगामी ‘विक्रम वेधा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच ‘विक्रम वेधा’च्या निर्मात्यांनी शुक्रवारी (दि. 16 सप्टेंबर) आयटम नंबर ‘अल्कोहोलिया’चा टिझर लाँच केला आहे.
या म्युझिक व्हिडिओमध्ये ऋतिक रोशन (Hrithik Roshan) उत्सव साजरा करताना दिसत आहे. गाण विशाल- शेखर, स्निग्धजित भौमिक आणि अनन्या चक्रवर्ती यांनी गायलं आहे, तर गाण्याला संगीत विशाल-शेखरने दिल असून गाणं मनाेज मुंतशीर यांनी लिहिलं आहे. ऋतिक डान्ससाेबतच गाण्याचे बाेलही चाहत्यांच्या पंसतीस उतरत आहेत.
गाण्यावर एका युजरने कमेंट करत लिहिले की, “वेधाचा दम.” दुसऱ्या युजरने ऋतिकची प्रशंसा करत लिहिले की, “त्याने आपल्या ऍक्टिंग, डान्स, ऍक्शन आणि लूकने बाॅलिवूडचा स्तर उंचावला आहे… ऋतिक एक फुल पॅकेज आहे. त्याच्या लूक्स, ऍक्टिंग आणि डान्स करण्याच्या पद्धतीविषयी काय बाेलावं.”
या गाण्याच्या माध्यमातून ऋतिक तब्बल 3 वर्षानंतर डान्स फ्लाेरवर थिरकताना दिसत आहे. ऋतिक अखेरचा 2019 साली ‘वॉर’ या चित्रपटात डान्स करताना दिसला हाेता. दुसरीकडे, ‘विक्रम वेधा’ या चित्रपटात सैफ अली खान आणि राधिका आप्टे देखील मुख्य भूमिकेत दिसणार असून हा चित्रपटात 30 सप्टेंबर, 2022रोजी सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे.
‘विक्रम वेधा’ हा त्याच नावाच्या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे, ज्यात आर माधवन आणि विजय सेतुपती हे मुख्य भूमिकेत आहेत. ‘विक्रम वेधा’ची स्टाेरी प्रचंड ट्विस्टने भरलेली आहे, कारण विक्रम (सैफ अली खान) एका पोलिसाची भूमिका साकारत आहे, तर वेधा (ऋतिक रोशन) एक भयानक गुंड्याची भूमिका साकारत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘विक्रम वेधा’ची स्टाेरी खूप रंजक असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. ‘विक्रम वेधा’व्यतिरिक्त, ऋतिक रोशन सिद्धार्थ आनंद यांच्या पुढील ऍक्शन थ्रिलर ‘फायटर’ सिनेमात दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बापरे! सुकेश गुन्ह्यात अडकलाय, हे माहित असूनही जॅकलिनने त्याच्याशी तोडले नव्हते संबंध; स्वप्नातील…
अमिताभ बच्चन यांचा जुहूमधील ‘त्या’ बंगल्याविषयी मोठा खुलासा, एकाच क्लिकवर घ्या जाणून
सुपरस्टार धनुषचा ‘नेने वस्थुन्ना’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज, दुहेरी भूमिकेत झळकणार अभिनेता