Saturday, July 27, 2024

बेस्ट सपोर्टिंग रोलसाठी शबाना आझमीला ऍवाॅर्ड,पुरुषांमध्ये विकी कौशलने केला कब्जा

शनिवारी 27 जानेवारीला फिल्मफेअर ऍवाॅर्डच्या(FilmFare award 2024) सोहळ्याला सुरूवात झाली. काल टेक्निकल ऍवाॅर्ड वाटप सोहळ्यात विजेत्यांची घोषणा झाली. आज गुजरातमधील गांधीनगरमध्ये फिल्मफेअर ऍवाॅर्डमधील मुख्य श्रेणीच्या पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार दिला जात आहे. सर्व कलाकार आज गुजरातमध्ये पोहोचले आहेत. सध्या गुजरातमध्ये पुरस्कारांची वाटप सुरु आहे. बेस्ट स्टोरीच्या विभागात मनोज वाजपेयीचा चित्रपट ‘जोरम’ आणि अक्षय कुमारचा ‘ओएमजी 2’ने बाजी मारली आहे. त्याचसोबत विधु विनोद चोप्राच्या ’12 फेल’ या चित्रपटाला बेस्ट स्क्रीनप्लेसाठी फिल्मफेअर ऍवाॅर्ड मिळाला आहे.

69व्या फिल्मफेअर ऍवाॅर्ड सोहळ्यात संदीप रेड्डी वांगा(Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित चित्रपट ‘ऍनिमल’ला देखील ऍवाॅर्ड मुळाले आहेत. ‘ऍनिमल'(Animal) चित्रपटासाठी बेस्ट म्यूझिक ऍवाॅर्ड प्रीतम, विशाल मिश्रा, मनन भारद्वाज, श्रेयस पुराणिक, भुपेंद्र बब्बल इ. कलाकारांना मिळाले आहे. या ऍवाॅर्ड सोहळ्यात ऍनिमलमध्ये मुख्य भुमिका करणारा रणबीर कपूरदेखील(Ranbir kapoor) पोहोचला आहे. त्याने घातलेल्या काळ्या पेहरावात तो एकदम डॅशिंग दिसत आहे.

फिल्मफेअर ऍवाॅर्ड 2024मध्ये ‘ऍनिमल’ मधील ‘अर्जन वेल्ली’ या गाण्यासाठी भुपेंद्र बब्बलला पुरुष वर्गातील बेस्ट प्लेबॅक सिंगरचे फिल्म फेअर ऍवाॅर्ड मिळाले आहे. तर दुसरीकडे महिला वर्गात ‘पठान’च्या ‘बेशरम रंग’ गाण्यासाठी शिल्पा रावला बेस्ट प्लेबॅक सिंगर ऍवाॅर्ड दिले आहे.

फिल्मफेअरमध्ये सलमान खानची(Salman Khan) भाच्ची अलीजेग अग्निहोत्रीला देखील ऍवाॅर्डने सन्मानित केले आहे. तिला तिच्या ‘फर्रे’ या चित्रपटासाठी महिला वर्गातील बेस्ट डेब्यूचं ऍवाॅर्ड दिले आहे. तर पुरूष वर्गातील बेस्ट डेब्यूचं ऍवाॅर्डआदित्य रावलला देण्यात आलं आहे. त्याला त्याच्या ‘फराज’ या चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

महिला वर्गातील बेस्ट सपोर्टिंग पात्रासाठी शबाना आझमी(Shabana Azmi) यांना फिल्मफेअर ऍवाॅर्ड मिळालं आहे. त्या ‘राॅकी और राणी की प्रेम कहानी’ मध्ये नायिकेच्या आजीचे पात्र वटवले होते. या पात्रासाठी त्यांना हा पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे. त्याचसोबत पुरूष वर्गात ‘डंकी'(Dunki) या चित्रपटातील सपोर्टिंग रोलला हा पुरस्कार देण्यात आला आहे. डंकी चित्रपटात विकी कौशलने(Vicky Kaushal) सपोर्टिंग रोल निभावला होता. त्यासाठी त्याला या फिल्मफेअर ऍवाॅर्डने सन्मानित केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

फिल्मफेअरचे नाॅमिनेशनस आउट; शाहरुखला बेस्ट ऍक्टरसाठी दोन,तर ऍनिमलला तब्बल 19 नाॅमिनेशनस
‘एका पेगमध्ये औकात कळते’ स्वतःबद्दलच नवाजुद्दीन सिद्दीकीने का केले असे वक्तव्य? वाचा कारण

हे देखील वाचा