Monday, July 1, 2024

चित्रपट निर्माते आनंद पंडित यांनी पूर्ण केले वचन; बिग बींचा ‘चेहरे’ ‘या’ दिवशी चित्रपटगृहात होणार रिलीझ

कोरोना महामारीमुळे जगातील सर्व उद्योग व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपट सृष्टीतील अनेक चित्रपट रखडले गेले होते. आता कुठे कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येताना दिसत आहे. रुग्णांची संख्या लक्षात घेऊन शासनाने सर्व व्यवसाय सुरु करण्यासाठी नियमावली लागू केली आहे. तसेच चित्रपटसृष्टीला देखील परवानगी देण्यात आली आहे. बॉलिवूडचे आता एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित व्हायला सुरुवात झाली आहे. अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटानंतर दीर्घकाळ चर्चेत असलेल्या ‘चेहरे’ हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘चेहरे’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. होय, चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. ‘चेहरे’ हा चित्रपट २७ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या मिस्ट्री थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन रूमी जाफरी यांनी केले असुन, आनंद पंडित यांनी त्याची निर्मिती केली आहे. आनंद पंडित यांना अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपट बनवायचा होता. या चित्रपटाने त्याची इच्छा पूर्ण केली आहे.

पंडित म्हणाले की, “हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठीच बनत आहे, असे माझ्या मनात सुरुवातीपासूनच स्पष्ट झाले होते. ‘चेहरे’ हा केवळ थीमवर आधारित एक मजबूत चित्रपट नाही, तर त्यात ती भव्यता आहे, जी केवळ मोठ्या पडद्यावर जादू करू शकतो. मी थिएटरमध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट बघत मोठा झालो, पण माझ्या प्रॉडक्शन फिल्ममध्ये अमिताभ बच्चन यांना मोठ्या पडद्यावर पाहणं रोमांचच्या पलीकडे असेल. हा चित्रपट २७ ऑगस्टला जगभरात प्रदर्शित होणार आहे, यापेक्षा माझ्यासाठी आनंददायक काहीच नाही.”

पंडित यांनी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याचे आणखी एक कारण दिले आहे. त्यांना थिएटर मालकांशी एकजूट दाखवायची होती. कारण कोरोना विषाणूच्या साथीमुळे चित्रपट वितरक आणि थिएटर मालकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आनंद पंडित म्हणाले, की अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाने थिएटर पुन्हा सुरू करण्यापेक्षा चांगले काय? चित्रपट उद्योग हे एक असे कुटुंब आहे. ज्याने कोरोना विषाणूच्या काळामध्ये खूप त्रास सहन केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-या वीकेंडलाही ‘सुपर डान्सर’मध्ये शिल्पा शेट्टी गैरहजर; पण जॅकी अन् संगीताची जोडी लावणार ‘चार चाँद’

-आर माधवनसोबत विमानात पहिल्यांदाच घडले ‘असे’ काही; अभिनेत्याचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

-युरोप फिरून ५ महिन्यानंतर मायदेशी परतली परिणीती चोप्रा; म्हणाली, ‘आपल्या घरासारखे…’

हे देखील वाचा