Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

शाळेत रात्री मोठ्या आवाजात गाणे वाजताच संतापले दिग्दर्शक; पोलिसांना टॅग करत म्हणाले, ‘कान फाटणाऱ्या…’

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या आघाडीच्या कलाकारांमध्ये दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचाही समावेश होतो. त्यातही ते ट्विटरवर अधिक सक्रिय असतात. त्यांच्या ट्वीट्समुळे ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात. अशात त्यांचे एक ट्वीट भलतेच चर्चेत आहे. यामधून त्यांनी एका शाळेविरुद्ध तक्रार दाखल केली. काय आहे नेमकं प्रकरण, चला सविस्तर जाणून घेऊया…

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी तक्रार करत म्हटले की, शाळेच्या कार्यक्रमात रात्री उशिरा सेक्सी गाणे जोरात आवाजात वाजवले जात होते. त्यांच्या या तक्रारीनंतर हैदराबाद पोलिसांना तातडीने दखल घेतली आणि कारवाईदेखील सुरू केली. रविवारी (दि. 08 जानेवारी) राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर करत तक्रार केली, ज्यामध्ये त्यांनी हैदराबाद पोलीस अधिकाऱ्यांनाही टॅग केले होते.

व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की, “फिल्म नगर रोड नंबर 71च्या पब्लिक स्कूलमध्ये कान फाटणाऱ्या आवाजात मुलांसाठी रात्री सातत्याने सेक्सी आयटम साँग वाजवले गेले. प्रशासनाला फक्त पबची समस्या आहे.”

या ट्वीटवर प्रतिक्रिया देत हैदराबाद सिटी पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवरून उत्तर देण्यात आले की, “सर, हे प्रकरण जुबिली हिल्स पोलीस स्टेशनकडे कारवाईसाठी पाठवण्यात आले आहे. यावर तेथील एसएचओ यांनी उत्तर दिले आहे की, ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.”

राम गोपाल वर्मा यांचे काम
राम गोपाल वर्मा यांच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं, तर त्यांचा ‘कोंडा’ हा शेवटचा सिनमा आहे. हा सिनेमा तेलुगू भाषेत बनवण्यात आला होता. हा पॉलिटिकल ड्रामा सिनेमा आहे, जो मागील वर्षी जूनमध्ये रिलीज झाला होता. याव्यतिरिक्त त्यांचा 2021मध्ये ’12 ओ क्लॉक’ हा हिंदी हॉरर सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात मिथुन चक्रवर्ती, मकरंद देशपांडे, आशिष विद्यार्थी आणि मानव कौल यांच्या व्यक्तिरेखा होत्या. (filmmaker ram gopal varma complaint file against hyderabad school know the reason)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘काहीही होऊ दे, माझं…’, म्हणत समंथा भर कार्यक्रमात ढसाढसा रडली; व्हिडिओ जोरदार व्हायरल
काय सांगता! पूर्ण कपडे न घालण्यामागे उर्फी जावेदने सांगितले धक्कादायक कारण, तुम्हीही व्हाल हैराण

हे देखील वाचा