Friday, April 19, 2024

राम गोपाल वर्मा यांनी पुन्हा केले वादग्रस्त ट्विट; म्हणाले, ‘अभिनेत्रीच्या कुत्र्याचे पाय चाटायला…’

प्रसिद्ध दिग्दर्शक राम गाेपाल वर्मा सध्या त्यांच्या आगामी ‘डेंजरस’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. मात्र, यासाठी ते आपली इज्जत घालवताना दिसत आहे. खरं तर, अलीकडेच एका यूट्यूब मुलाखतीत ते अभिनेत्री आशु रेड्डी यांच्या शेजारी बसून तिच्या पायाचे चुंबन घेताना दिसले होते. या व्हिडीओनंतर राम गोपाल वर्मावर जाेरदार टिका झाली. त्याचवेळी आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत असे कृत्य केल्याने अनेकांनी त्यांना फटकारले.

राम गाेपाल वर्मा यांनी केले वादग्रस्त ट्विट
दरम्यान, राम गोपाल वर्मा (ram gopal verma) यांनी एक नवीन ट्विट केले आहे. या ट्विटसोबत त्यांनी 2 फाेटाेही जोडली आहेत. फोटो शेअर करताना राम गोपाल वर्मा यांनी लिहिले की, “आशु रेड्डी यांच्या पायाजवळ जाे मी डेंजरस इमोशन अनुभवला ताे मी अप्सरा राणीच्या कुत्र्याकडून शिकलो. तिचा इन्स्टा आयडी इथेच आहे.” त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर जाेरदार व्हायरल हाेत आहे. यावरून अनेकांनी त्यांना ट्रोलही केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashu Reddy (@ashu_uuu)

राम गाेपल वर्मा यांच्या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर केला दमदार व्यवसाय
राम गोपाल वर्मा हे चित्रपट दिग्दर्शक आहे. त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करतात. यामध्ये ‘सत्या’, ‘श्रीदेवी’,’रंगीला’,’राम गाेपल वर्मा की याद’, ‘सत्या 2’ यासारख्या दमदार चित्रपटांचा समावेश आहे. सध्या ते त्यांच्या आगामी डेंजरस चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र, यावरून ते खूप ट्रोलही होत आहे.

आता या वादाचा त्यांच्या चित्रपटावर काय परिणाम होतो हे पाहायचे आहे. (bollywood ram gopal verma feet lick row director tweets again says he learned to lick feet from actress apsara rani dog)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
सनी देओल सोडाच, रजनीकांत यांच्यावरही भारी पडली होती श्रीदेवी; तिनंच ठरवलेलं सिनेमात कुणाला करायचं कास्ट
रजनीकांत यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

हे देखील वाचा