कोरिओग्रफर धनश्री वर्मा नेहमीच चर्चेत असते, कधी आपल्या डान्स मुळे तर कधी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे. ती सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या चाहत्यांना खूश करण्याची एकही संधी सोडत नाही. ती फक्त डान्सच नाही तर मॉडेल देखिल आहे. मात्र, तिला खरी ओळख क्रिकेटपटू युजवेंद्र चहल याच्यासोबत नात्यामध्ये आल्यावर मिळाली. आज (दि.27 सप्टेंबर) दिलशी आपला वाढदिवस साजरा करत आहे.
डान्सर धनश्री वर्मा(Dhanashree Verma) आणि क्रिकेटर युजवेंद्र चहल(Yuzvendra Chahal हे खूप दिवसापासून एकमेकांना डेट करत होते आणि काही दिवसापूर्वी त्यांनी आपले नाते जगासमोर आणले आणि त्यानंतर धनश्रीला खरी ओळख मिळाली. धनश्री डान्सर, मॉडेल असून सुद्धा ती एक डेंटल डॉक्टर आहे. तिने मुंबईमध्ये डीवाय पाटील कॉलेजमध्ये आपले डॉक्टरीचे शिक्षण पूर्ण केले होते मात्र, धनश्रीने त्यामध्ये करिअर नाही केले आणि आज प्रसिद्ध डान्सर आणि मॉडेल आहेत.
धनश्री वर्मा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असल्याने तिचा चाहतावर्ग बनला आहे. याशिवाय धनश्री एका डान्स कंपनाची मालकीण आहे. तिने स्वत:च्या नावाने डान्स कंपनी सुरु केली आहे. ती चाहत्यांसाठी डान्स आणि फिटनेसचे व्हिडिओ शेअर करत असते त्यामुळे सोशल मिडियावर तिचे करोडो चाहते आहेत. तिला इंस्टाग्राम आणि युट्यबवर खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो. लोक तिच्या व्हिडिओला खूपच पसंद करत आहेत. युजवेंद्रसोबत लग्न केल्यानंतर तिचे आणखीच फॉलोअर्स वाढले आहेत.
भारतीय क्रिकेट टीमचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा गेल्या काही दिवसापासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी एकमेकांना ओळखण्यासाठी काही महिन्याचा कालावधी घेतला होता. यांच्या रिलेशनबद्दल कोणालाच माहित नव्हते. यानंतर काही दिवसांनी चहल याने धनश्रीबद्दल आपल्या आई-वडीलांना सांगितले आणि दोन्ही कुटूंबाकडून लग्नाची परवानगी मिळवली. चहल याने 8 ऑगस्ट 2020 दिवशी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर होणारी बायको धनश्री सोबतचा फोटो शेअर करुन सगळ्यांना चकित केले आणि (दि. 22 डिसेंबर 2020) दिवशी डेस्टिनेशन वेडिंग केली होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केलेल्या यश चोप्रा यांनी, शाहरुखसह अनेक कलाकारांना बनवले सुपरस्टार
अभिनव शुक्ला ‘या’ आजाराने आहे ग्रस्त, तर आजार स्वीकारण्यास लागली तब्बल 20 वर्षे
खलनायकी साकारणारून राहुल यांनी मिळवलीय लोकप्रियता; वयाच्या 54व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीसह आहेत ‘लिव्ह-इन’मध्ये