Thursday, June 13, 2024

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केलेल्या यश चोप्रा यांनी, शाहरुखसह अनेक कलाकारांना बनवले सुपरस्टार

बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. इतकेच नव्हे, तर यश चोप्रा यांच्या चित्रपटांमधून अनेक बॉलिवूड कलाकारांना एक वेगळी ओळख देखील मिळवून दिली होती. भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्माते म्हणून यश यांना ओळखले जाते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 8 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. 2001 साली भारत सरकारने त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 2005 साली पद्मभूषण पुरस्कार दिला. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर एक वर्षाने भारत सरकारने ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या सुपरहिट चित्रपटातील त्यांचा कॅमेरा धरल्याचा फोटो असलेले टपाल तिकीट जारी केले.

यश यांनी सुरुवातीला इंद्रजीत सिंग जोहर आणि  बी‌. आर. चोप्रा यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी 1959 साली आलेल्या ‘धूल का फूल’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. पुढे त्यांनी 1961 मधील ‘धर्मपुत्र’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. पण त्यांना अपेक्षित यश मिळत नव्हते. मात्र 1965 साल त्यांच्यासाठी एक उत्तम साल ठरले. याचसली प्रदर्शित झालेल्या ‘वक्त’ चित्रपटामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात बलराज साहनी, सुनील दत्त, साधना आणि शशी कपूर यांच्यासारखे मोठे कलाकार होते. यश यांचा जन्म लाहौर येथे 27 सप्टेंबर 1932 साली झाला.

https://www.instagram.com/p/CUUDqDZKH8Z/?utm_source=ig_web_copy_link

अनेक चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर यश यांनी प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केली. त्यांनी या हाऊसला ‘यश राज फिल्म्स’ असे नाव दिले. यशराज फिल्म्सच्या हाऊसमध्ये तयार झालेला पहिला चित्रपट म्हणजे राजेश खन्ना, शर्मिला टागोर आणि राखी यासारखा  स्टारचा  चित्रपट ‘दाग’. 70 चे दशक त्याच्यासाठी यशस्वी ठरले. त्यांनी ‘दीवार’, ‘कभी कभी’ आणि ‘त्रिशूल’ सारखे सुपरहिट चित्रपट यावर्षीही दिले. यश चाप[रा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

 

यश यांनी श्रीदेवीसोबत ‘चांदनी’ आणि ‘लम्हे’ या रोमँटिक चित्रपटांमध्ये काम केले. या दोन्ही चित्रपटांची गणना बॉलिवूडच्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये केली जाते. 1993 मध्ये यश यांनी थ्रिलर असणारा ‘डर’ सिनेमा दिग्दर्शित केला. शाहरुखसोबतचा हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. यानंतर त्यांनी शाहरुखसोबत अनेक रोमँटिक चित्रपट केले. या चित्रपटांमध्ये १९९५ मध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, 1997 मध्ये ‘दिल तो पागल है’, 2000 साली ‘मोहब्बतें’, 2004 मध्ये ‘वीर-जारा’ आणि ‘जब तक है जान’ आदी सिनेमांचा समावेश आहे. या चित्रपटांमुळे शाहरुख बॉलिवूडचा रोमँटिक हिरो म्हणून नावारूपास आला.

यश यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला शेवटचा चित्रपट शाहरुखसोबतचा ‘जब तक है जान’ हा होता. या चित्रपटात कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्याही भूमिका होत्या. यश यांना डेंग्यूचा ताप आला होता या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला एका महिना झाल्यानंतर ‘जब तक है जान’ मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
अभिनव शुक्लाला आहे ‘ऍडव्हेंचर’ची प्रचंड आवड, ‘या’ पर्वतावरही केलीय अभिनेत्याने चढाई
खलनायकी साकारणारून राहुल यांनी मिळवलीय लोकप्रियता; वयाच्या 54व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीसह आहेत ‘लिव्ह-इन’मध्ये

हे देखील वाचा