Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

थलैवानंतर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमणने ‘कांतारा’चे केले कौतुक, फोटो सोशल मीडियावर होताय व्हायरल…

सध्या अनेक चित्रपटांपैकी एकाच चित्रपटाचा सर्वत्र बोल बोला सुरु आहे तो म्हणजे ‘कांतारा‘ या चित्रपटाने अनेक लोकांवर भुरळ घातली आहे. कन्नड चित्रपट कांताराच्या कथेने अनेक लोकांना प्रभावित केले आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना झाला असूनही चित्रपट गृहामध्ये गर्दी काय थांबायचे नाव घेत नाही.  चाहतेच नाही तर अनेक कालरांनाही चित्रपटाच्या कथेने घेरले आहे. आता केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामम यांनी देखिल बुधवार (दि. 2 नोव्हेंबर) दिवशी ‘कांतारा’ पाहण्यासाठी थेट चित्रपट गृहामध्ये हजेरी लावली होती.

दिग्दर्शक आणि अभिनेता रिषभ शेट्टी ( Rishabh Shetty) याचा कन्नड चित्रपट ‘कांतारा’ (Kantara) हिंदीमध्ये प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. प्रेक्षकांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत या चित्रपटाने भुरळ घातली असून सर्वत्र कौतुक केले जात आहे. नुकतंच भारताचे केंद्रिया मंत्री निर्मला सीतारामण (Union Minister Nirmala Sitharaman) यांनी देखिल बुधवारी (दि. 2 नाेव्हेंबर) आपल्या कर्मचाऱ्यांसोबत ‘कांतारा’ चित्रपट पाहण्यासाठी हजेरी लावली होती. त्यांना हा चित्रपट खुपच आवडला. त्यांनी कांताराचे कौतुक करत सोशल मीडियवर पोस्ट शेअर केली आहे.

निर्माला सितारमम यांना आपल्या कर्मचाऱ्यासोबत कांताराचा आनंद लुटला. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर चित्रपट गृहामधील काही फोटो शेअर केले आहेत. त्यासोबतच त्यांनी दिग्दर्शक रिषभ शेट्टीचे कौतुक करत ट्वीटदेखिल केले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन ट्वीट करत लिहिले की, “स्वयंसेवक आणि शुभचिंतक यांच्यासोबत बेंगलुरुमध्ये कांतारा चित्रपट पाहिला. ( लेखक, दिग्दर्शक, अभिनेता) रिषभ शेट्टीने चित्रपटाला खूप चांगल्याप्रकारे चित्रित केले आहे. हा चित्रपट तमिळनाडू आणि करावलीची समृद्ध परंपरांना दाखवत आहे.”

यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक रिषभ यानेही सितारनन यांच्या ट्वीटला उत्तर देत लिहिले की, “धन्यवाद मॅडम”! यापूर्वी थलैवा रजनाकांत (Rajinikanth) यांनी देखिल कांतारा पाहिल्यानंतर खूप कौतुक केले होते. कांताराला हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित होऊन एक महिना होत असून अजूनही प्रेक्षकांप्रती चित्रपटाचा क्रेज वाढतच आहे. बॉक्स ऑफिसवर कांताराने अनेक रेकॉर्ड तोडले असून नवीन चित्रपटांसाठी आव्हान बनला आहे.

होम्बले फिल्म द्वारे निर्मित चित्रपट कांतारामध्ये रिषभ शेट्टीने मुख्य भूमिकेतसोबत चित्रपटाचे संवाद आणि दिग्दर्शन देखिल केले आहे. यामध्ये रिषभ शेप्ट्टीसोबत प्रमोद शेट्टी, सप्तमी गौडा, अभिनेता किशोर, अच्युत कुमार सारख्या अनेक कलाकारंनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी जेव्हा तिच्या रूम…’;बोनी कपूर यांनी नॅशनल टेलिव्हिजनवर शेअर केलं जान्हवी कपूरचं बाथरूम सिक्रेट
‘टिकली न लावून भारत माताला विधवासारखं…’; म्हणत, संभाजी भिडेंनी फटकारले महिला पत्रकाराला

हे देखील वाचा