Monday, July 15, 2024

‘कांतारा’चा बॉलिवूड रिमेक बनणार नाही! रिषभ शेट्टीने सांगितलं ‘हे’ मोठं कारण

सध्या सगळीकडे ‘कांतारा‘ चित्रपटाचीचं चर्चा सुरू आहे. जगभरात या चित्रपटाचं कौतुक होत आहे.अशावेळी त्याचा दिग्दर्शक रिषभवर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. ‘केजीएफ’नंतर सिनेप्रेमींवर आपला जादू कोणता चित्रपटने केला असेल तर तो कन्नड भाषेतील चित्रपट ‘कंतारा’. हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला, ज्याला खूप प्रशंसा मिळाली. पण रिषभ शेट्टी(Rishabh Shetty) याला ‘कंतारा’चा बॉलिवूडमध्ये रिमेक करायचा नाही. असे ऋषभनं म्हटले आहे. एका मुलाखतीतील त्याचे ती विनंती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

‘केजीएफ’ नंतर कांताराने कन्नड फिल्म इंडस्ट्रीसाठी यशाचा नवा विक्रम नोंदवला आहे. रिषभ शेट्टीने या चित्रपटात केवळ अभिनयच केला नाही, तर त्याचे दिग्दर्शन आणि कथाही लिहिली आहे. ‘कांतारा’ने प्रत्येक भाषेत कमाईच्या बाबतीत चमत्कार केले आहेत. बॉक्स ऑफिसवर त्याची कमाई अजूनही सुरूच आहे. रिषभ शेट्टी त्याच्या चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशाने खूप खूश आहे. एका मुलाखतीत त्यांनी ‘कांतारा’चे यश, त्याभोवतीचा वाद आणि त्याला प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल सांगितले. रिषभ शेट्टीनेही त्याला ‘कांतारा’चा बॉलीवूडमध्ये रिमेक का करायचा नाही हे स्पष्ट केले.

‘कांतारा’ या चित्रपटाला हिंदीत डब करण्यात आले आहे. रिषभला एक प्रश्न विचारण्यात आला की, अशा परिस्थितीत हिंदीत रिमेक होण्याची शक्यता आहे का. जर त्याचा हिंदीत रिमेक झाला असता, तर तुमची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारली असती असे त्यांना वाटते? याला उत्तर देताना रिषभ शेट्टी म्हणाला, ‘याचा हिंदी रिमेक बनणार नाही. अशा प्रकारची भूमिका करण्यासाठी गरजेचं आहे की तुमचा तुमच्या संस्कृती आणि संस्कारांशी जोडलेले असाल. त्यांच्यावर तुमचा विश्वास असेल. हिंदी फिल्म इण्डस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे मला आवडतात पण मला ‘कांतारा’ चा हिंदी रिमेक बनवायचा नाही. मला रिमेक बनवण्याची इच्छा नाही.’ असे ही ऋषभनं यावेळी सांगितले.

रिषभ म्हणाला, बॉलिवूडचे मार्केट सध्या कोणत्या स्थितीत आहे हे सर्वांना माहिती आहे. साऊथचे चित्रपट बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर बिझनेस करताना दिसत आहे. अशावेळी एखाद्या ओरिजनल चित्रपटाचा रिमेक तयार करणे आणि त्याचे सादरीकरण होणे हे मला पटत नाही. तो चित्रपट ज्या मातीतला आहे त्याची कॉपी करुन तो कितपत प्रेक्षकांना रुचेल, पटेल याविषयी शंका आहे. म्हणून मला जास्त भीती वाटते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता करतोय ‘या’ गंभीर आजाराचा सामना, सोशल मीडिया पोस्टमधून केले खबरदारीचे आवाहन
स्वतःवरच राहिला नव्हता विश्वास, ‘या’ व्यक्तीच्या निधनाने पूर्णपणे तुटला होता अर्जुन बिजलानी; वाचा

हे देखील वाचा