Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘एफआयआर’ फेम अभिनेत्री कविता कौशिकने साधला ‘बिग बॉस’वर निशाना, म्हणाली ‘फेक रियॅलिटी शो…’

टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक आपले रोखठोक वक्तव्य आणि फिटनेससाठी ओळखली जाते. मागील काही दिवसांमध्ये ती ‘बिग बॉस १४’ मध्ये दिसली होती. एकीकडे तिचा धाकड अंदाज चाहत्यांना भलताच आवडला, तर अनेकांनी तिला ट्रोलही केले. अशामध्ये आता कविताने चक्क बिग बॉसला फेक रियॅलिटी शो म्हटले आहे.

‘काहीही होवो नियंत्रित केले जाऊ शकते’
खरं तर कविताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये कविता योगा करताना दिसत होती. व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले होते की, “काहीही होवो नियंत्रित केले जाऊ शकते.”

चाहत्याने सांगितली ‘मन की बात’
कविताच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अक्षरश: कमेंट्सचा पाऊस पाडला. एका चाहत्याने लिहिले की, ‘तुम्हाला बिग बॉसमध्ये जायला नव्हते पाहिजे. मला नाही माहिती, परंतु यामुळे तुमच्या प्रतिमेला खूप नुकसान पोहोचले आहे. मी तुमचा चाहता आहे आणि तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या चांगल्या गोष्टींसाठी प्रार्थना करतो.’

कविताने दिले प्रत्युत्तर
चाहत्याच्या या कमेंटची दखल स्वत: कवितानेही घेतली. तिने प्रत्युत्तर देत लिहिले की,  ‘हे ठीक आहे, ते म्हणतात ना, एकदा तुमची प्रतिमा खराब झाली, तर तुम्ही मुक्त होता. मी त्या लोकांकडेे बिल्कुल लक्ष देत नाही, जेे फेक रियॅलिटी शो पाहून एखाद्यावर प्रेम किंवा तिरस्कार करतात.’

या मालिकेतून केले टीव्हीवर पदार्पण
कविता कौशिकने निर्माती एकता कपूरच्या ‘कुटुंब’ या मालिकेतून सन २००१ साली टीव्हीवर पदार्पण केले. यानंतर तिने अनेक मालिकेत काम केले. ‘एफआयआर’ या मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली. यामध्ये तिने ‘चंद्रमुखी चौटाला’ ही भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘द बिग बुल’ पाहून युजरने अभिषेक बच्चनच्या अभिनयाला म्हटले ‘थर्ड क्लास’, त्यानेही दिले गांधीगिरी स्टाईलमध्ये प्रत्युत्तर

-खरंच! राहुल वैद्य आणि दिशा परमारने केले गुपचुप लग्न? फोटो पाहून चाहते करतायत अभिनंदन

-धक्कादायक! बिग बॉस कन्नडच्या माजी कंटेस्टेंटचा फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; सासरच्यांवर केले गंभीर आरोप

हे देखील वाचा