Friday, July 5, 2024

कांतारा चित्रपटातील अभिनेत्याविरुद्ध गुन्हा दाखल; ‘भूत कोला’ परंपरेवर केलं वादग्रस्त विधान

‘कांतारा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. कांतारा(Kantara) या कन्नड चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने कन्नड ते हिंदीत बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर ‘भूत कोला’ची परंपरा चर्चेत आली आहे. यादरम्यान, कन्नड अभिनेता चेतन कुमार अहिंसा(Chetan Kumar Ahimsa) यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. ‘भूत कोला’च्या परंपरेवर त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे. चेतन कुमार अहिंसा याच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आहे.

माध्यमाच्या वृत्तानुसार, कर्नाटक पोलिसांनी कन्नड अभिनेता चेतनविरोधात एफआयआर नोंदवला आहे. चेतनवर ‘भूत कोला’ परंपरेवर आक्षेपार्ह टिप्पणी करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. चेतन अहिंसा याने कांतारा चित्रपटात वापरण्यात आलेल्या ‘भूत कोला’च्या परंपरेवर अपमानास्पद टिप्पणी केल्याचे म्हटले जात आहे. अभिनेत्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

‘कंतारा’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना चेतन अहिंसा म्हणाला की, भूत कोला ही परंपरा हिंदू धर्माचा भाग नाही. हिंदू धर्माच्या अस्तित्वात येण्यापूर्वी ती प्रथा सुरु होती. त्यामुळे ज्याप्रमाणे हिंदू भाषा ही कोणावर लादता येत नाही. त्याचप्रमाणे हिंदुत्वही कोणावर लादता येत नाही. भूत कोला ही देशातील मूळ रहिवाशांची परंपरा आहे. ती हिंदू धर्मात येणार नाही.

ही तक्रार कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी दाखल करण्यात आली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार,’कन्नड चित्रपट ‘कंतारा’ मध्ये चित्रित केलेल्या ‘भूत कोला’ च्या परंपरेवर भाष्य करताना “अपमानजनक” विधान केल्याचा आरोप चेतनवर करण्यात आला. त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.’

1847 च्या काळातील कथा ‘कंतारा’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट 30 सप्टेंबरला त्याच्या मूळ कन्नड या भाषेत प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केले होते. सध्या या चित्रपटाने जगभरात 170 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 17 कोटींची कमाई केली आहे. याला मिळालेली लोकप्रियता पाहता या चित्रपटाला तेलुगू आणि हिंदी भाषेत डब करून प्रदर्शित करण्याचा निर्णय या चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला. ‘कांतारा’ हा चित्रपट एक ऍक्शन थ्रिलर आहे. अनेक कलाकांनी कांतारा या चित्रपटाचं कौतुक केलं. चित्रपटाचं कन्नड व्हर्जन ब्लॉकबस्टर ठरले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अभिषेकनं नेटकऱ्याची केली बोलती बंद! ‘बेरोजगार’ बोलण्याऱ्या ट्रोलरला दिलं सडेतोड उत्तर

झायरा वसीमने बॉलिवूड इंडस्ट्रीला ठोकला राराम! कारण ऐकूण तुम्ही व्हाल थक्क…

हे देखील वाचा