Friday, July 12, 2024

अभिषेकनं नेटकऱ्याची केली बोलती बंद! ‘बेरोजगार’ बोलण्याऱ्या ट्रोलरला दिलं सडेतोड उत्तर

बॉलिवूड अभिनेते अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हे त्यांच्या दमदार अभिनयानं चाहत्यांचे मनं जिंकतात. अभिषेक सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. अभिषेकला अनेकवेळी नेटकरी सोशल मीडियावर ट्रोल करतात. अलीकडेच एक ट्वीट शेअर करत एका नेटकऱ्यांने अभिषेकला ट्रोल केले आहे. या ट्वीटला अभिषेकनेही सडेतोड उत्तर दिला आहे.

अभिषेकने एका युझरला ट्विट करुन विचारलं की, “लोक अजूनही वर्तमानपत्र वाचतात का?” त्यानंतर लगेचच एका नेटकऱ्यांने अभिनेत्याला लिहिले, “शहाणे लोक वाचतात तुमच्यासारखे बेरोजगार नाहीत.” या नेटकऱ्याला उत्तर देत अभिषेकने लिहिले, ‘ओह, या माहितीसाठी धन्यवाद पण बुद्धी आणि रोजगार यांचा काहीही संबंध नाही. याचं उत्तम उदाहरण तुम्ही आहात. तुम्ही नक्कीच काम करत असाल. पण तुमच्या ट्वीटमधून असं लक्षात येतं की तुमच्याकडे बुद्धी नाहीये.’

अभिषेकच्या उत्तरावर प्रतिक्रिया देताना, चाहत्यांनी नंतर अभिनेत्याचे कौतुक केले. एकाने कमेंट केली, सर मी मोठ्या पडद्यावर तुमचे काम पाहिले आहे. कृपया अशा ट्वीटकडे दुर्लक्ष करा.’ तर दुसऱ्याने लिहिलं, ‘या लोकांना दुसऱ्यांना ट्रोल करुन आनंद मिळतो. तुम्ही चांगले अभिनेता आणि व्यक्ती आहात. कृपया अशा ट्वीटकडे लक्ष नका देऊ’.

श्वेता बच्चनही चिडली होती ट्रोलर्सवर
अभिषेक बच्चन हा अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा मुलगा आहे. तो अनेकदा त्याच्या विनोदाने सोशल मीडियावर ट्रोल्सचा सामना करताना दिसतो. याबद्दल बोलताना, अलीकडेच तिची बहीण श्वेता बच्चन मुलगी नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टवर म्हणाली, “हे वाईट आहे. ते त्याच्यावर नेहमीच हल्ला करतात आणि हे तुमच्या कुटुंबातील सदस्यासाठी खरोखर त्रासदायक आहे, ज्यामुळे माझे रक्त खळखळते. मला यापैकी कशाचीही पर्वा नाही, याचा तुम्हाला त्रास होत आहे पण मला खरोखर त्रास होतो. जेव्हा ते तिच्याशी असे करतात तेव्हा मला ते आवडत नाही, कारण तुला माहित आहे काय, ते योग्य नाही… ! फक्त…मला त्यावर चर्चा करायची नाही. हे मला खरोखर त्रास देते कारण तो माझा लहान भाऊ आहे आणि मी पूर्णपणे संरक्षक आहे. दुसरीकडे, पॉडकास्टचा एक भाग असलेल्या जया बच्चन यांनी अभिषेकच्या विनोदबुद्धीबद्दल आणि टीकेला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांनी प्रशंसा केली.

ब्रीद: इनटू द शॅडोज सीझन-2 ही अभिषेकची वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजमध्ये अभिषेक बच्चनसोबतच अमित साध, नित्या मेनन, सैयामी खेर, इवाना कौर, नवीन कस्तुरिया हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘सिद्धू’ने 5 वर्षे बघितली होती खऱ्या प्रेमाची वाट, वाचा त्याचा जीवनप्रवास
‘आज माझ्या ‘या’ पहिल्या बॉलिवूड चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण’, म्हणत सिद्धार्थ जाधवने दिला आठवणींना उजाळा

हे देखील वाचा