Monday, July 1, 2024

‘आधी भारतीय संस्कृती शिका मग मला…’,उर्फी जावेदचं चित्रा वाघ यांना सडेतोड प्रत्युत्तर

अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्याकपड्यांवर आक्षेप केला असून तिच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, तसेच पोलिसांनी नोंदवलेल्या तक्रारीरवर दखल घेतली आहे. शनिवार (दि, 14 जानेवारी) रोजी उर्फीला चौकशीदरम्यान पोलिस चौकीत बोलवाले होते. तेव्हा उर्फीने तिचा जबाब नोंदवला की, ‘तिला तिच्या आवडीचे कपडे परिधान करणे हा अधिकर भारतीय राज्यघटनेने दिला आहे. त्याशिवाय ती जे कपडे परिधान करते तो तिच्या कामाचाच एक भाग आहे, असं उर्फीने सांगितलं होतं. मात्र, यनंतर उर्फीने सोशल मीडियावरुन ट्वीट शेअर करत चित्रा वाघ यांनाच जाब विचारला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामध्ये वाद सुरुच आहे. यो दोघींमध्ये सोशल मीडिया वॉर बघायला मिळत आहे. अशातच उर्फीला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवाले होते तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता की तिला कोठडी होईल? मात्र, उर्फीने देखिल पत्रकारितेचे शिक्षण घेतलं आहे. हे तिने दाखवून दिलं आहे. “एकीकडे त्यांना हिंदू राष्ट्र हवं आहे, दुसरीकडे त्यांना महिलांसाठी तालिबानी नियम लावायचे आहेत. हिंदू धर्म हा जगातला सर्वात प्राचीन धर्म आहे. हा धर्म कायमच महिलांचा आदर करत आला आहे त्यांना स्वातंत्र्य देणारा आहे. मग हे कोणत्या संस्कृतीबाबत बोलत आहेत?” असा प्रश्न आता उर्फी जावेदने भाजपाला आणि चित्रा वाघ यांना विचारला आहे.

उर्फी ट्वीट शेअर करत म्हणाली, “महिलांच्या कपड्यांबाबत तालिबानी नियम लादणाऱ्यांना हिंदू राष्ट्रही हवं आहे. पण ही यांची कुठली संस्कृती आहे? भारतीय संस्कृती ही महिलांचा आदर करणारी आणि त्यांना स्वातंत्र्य देणारी आहे. मी तुम्हाला सांगते की संस्कृतीचा भाग काय नाही? बलात्कार, डान्स बार, राजकारण्यांनी महिलांना त्यांच्या कपड्यांवरून उघड धमक्या देणं हे सगळं आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग नाही.”

त्याशिवाय उर्फीने ट्वीटमध्ये प्राचीन मुर्त्यांचे फोटो शेअर करत अजून एका ट्वीटमध्ये लिहिले की, “प्राचीन काळात हिंदू स्त्रिया कशा प्रकारे वस्त्रालंकार करत होत्या एकदा बघा. त्या काळातही महिलांना त्यांचे कपडे, त्यांची वस्त्रं, आभूषणं निवडण्याचा अधिकार होता. त्या महिला खेळांमध्ये, राजकारणात सहभाग घेत होत्या. त्या काळातले हिंदू हे सर्वसमावेशक होते. त्यांच्याकडून जरा भारतीय संस्कृती शिका असंही उर्फी जावेद म्हटली आहे.”

उर्फीने केल्या ट्वीटनंतर चित्रा वाघ काय प्रतक्रिया देतिल हे पाहाणे खूपच महत्वाचं ठरणार आहे. त्याशिवाय त्यांनी देखिल उर्फीला उर्फी जावेदवर जोपर्यंत कारवाई केली जात नाही आणि ती पूर्ण कपडे घालत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. माझी लढाई उर्फी विरोधात नाहीच. तर तिच्या विकृतीच्या विरोधात आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र, उर्फीने त्यांनाच उलट प्रश्न केला आहे. आता हा वाद कोणतं नवीन वळन घेइल हे पहाणे खूपच महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या…
तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार! मानसी नाईकाचा मकरसंक्राती स्पेशल लूक

हे देखील वाचा