Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड भारताची पहिली ‘स्टंटगर्ल!’ ‘बसंती’ बनून धोकादायक सीन शूट करताना मरता-मरता वाचलेली रेशमा पठाण

भारताची पहिली ‘स्टंटगर्ल!’ ‘बसंती’ बनून धोकादायक सीन शूट करताना मरता-मरता वाचलेली रेशमा पठाण

मोठ्या पडद्यावर दिसणारे खतरनाक स्टंट पाहून आपले डोळे मोठे होतात. अनेकांना आपल्या आवडत्या अभिनेत्याला- अभिनेत्रीला काही झालं तर नाही ना ही भीती वाटते. मात्र, हे धोकादायक दृष्य, भयानक स्टंट अभिनेता- अभिनेत्री करत असल्याचं दाखवलं जात असलं तरी या पडद्यामागेही एक जग आहे. हे सगळे स्टंट स्टंटबॉय किंवा स्टंटगर्ल करतात. ते कलाकारांचे बॉडी डबल बनून स्टंट करत असतात. अशाच एका स्टंटगर्लविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

दिनांक 15 ऑगस्ट, 1975 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘शोले‘ (Sholay) या चित्रपटानं सगळ्या प्रेक्षकांच्या मनावर एक छाप सोडली होती. या चित्रपटातील एका दृश्यात हेमा मालिनी (Hema Malini) तिचा टांगा खूप वेगाने धावायला लावते आणि दगडावर आदळल्यावर टांग्याचे तुकडे होतात. हे धोकादायक दृश्य हेमा मालिनीने नव्हे, तर तिच्या बॉडी डबल रेशमा पठाण हिने मोठ्या पडद्यावर साकारले होते.

यावेळी रेशमा मरता मरता वाचली होती. ‘द शोले गर्ल’ रेशमा पठाण (Reshma Pathan) भारताची पहिली स्टंटगर्ल होती. ‘शोले’, ‘कर्ज’, ‘धरम वीर’ यांसारख्या सुमारे 500 चित्रपटांमध्ये रेशमाने हेमा मालिनी, रेखा, श्रीदेवी यांसारख्या बड्या अभिनेत्रींची बॉडी डबल बनून बरेच स्टंट केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चाळिशी पार करूनही एकटी जगतेय आयुष्य, साखरपुडा झाल्यानंतर सरकारी अधिकाऱ्याने दिलेला धोका
रश्मिकासोबत ‘सामी सामी’ गाण्यावर गोविंदाचा भन्नाट डान्स; व्हिडिओ तुफान व्हायरल

हे देखील वाचा