Friday, April 19, 2024

रश्मिकासोबत ‘सामी सामी’ गाण्यावर गोविंदाचा भन्नाट डान्स; व्हिडिओ तुफान व्हायरल

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना(Rashmika Mandanna) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रश्मिकाचे लाखो चाहते आहेत. रश्मिका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या रश्मिका ‘गुडबाय’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशमनमध्ये व्यस्त आहे. नुकतीच रश्मिकाने ‘डीआयडी सुपर मॉम्स 3’ शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी रश्मिका आणि गोविंदाचा धम्माल डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

90 च्या दशकात आपल्या अभिनयानं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता गोविंदा(Govinda) त्याच्या डान्सनं नेहमीच चाहत्यांना भुरळ घालत असतो. परंतु काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदनाची गोविंदाशी डिआयडी सुपर मॉम्सच्या सेटवर भेट झाली. त्यानंतर दोघांनाही एकमेकांसोबत डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही. दोघांनीही सामी-सामी या गाण्यावर भन्नाट डान्स केला.

 

View this post on Instagram

 

डिआयडी सुपर मॉम्सच्या ग्रँड फिनालेमध्ये रश्मिका आणि गोविदाने पुष्पा चित्रपटातील सामी-सामी या गाण्यावर डान्स करत कमाल केली. रश्मिकाने या गाण्यावर सिग्नेचर स्टेप्स केल्या, तर गोविंदाने त्याच्या हटके स्टाईलध्ये डान्स करत चाहत्यांना भुरळ पाडली. त्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पुष्पा चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आता चाहत्यांना या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रतिक्षा आहे. दुसऱ्या पार्टमध्येही अल्लू अर्जून आणि रश्मिकाची लव्हस्टोरी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. टॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर आता रश्मिकानं बॉलिवूडमध्ये येण्याची तयारी सुरू केली आहे. कारण आता ती लवकरच गुडबाय चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेयर करणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मला हे सर्व का मिळाले…’, ट्रोलिंगनंतर नेहा कक्करने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

आलियाच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर, जबरदस्त ॲक्शन सीन करताना दिसली अभिनेत्री
प्रियांका चोप्राने पती निक जोनासला स्टेजवरचं केले किस, व्हिडिओ तुफान व्हायरल

हे देखील वाचा