Thursday, April 24, 2025
Home साऊथ सिनेमा समंथासोबतच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलला नागा चैतन्य; म्हणाला, ‘जर ती आनंदी आहे…’

समंथासोबतच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलला नागा चैतन्य; म्हणाला, ‘जर ती आनंदी आहे…’

मागील वर्षी दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. वेगवेगळ्या चर्चांना यावेळी सोशल मीडियावर उधान आले होते. परंतु दोघांनीही याबद्दल माध्यमांसमोर बोलणे टाळले होते. मात्र, अलीकडेच एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अभिनेता नागा चैतन्यने याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

ऑक्टोबर २०२१ मध्ये समंथा आणि नागा चैतन्यने सोशल मीडियावरून वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला होता, ज्यामुळे चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनाच धक्का बसला होता. जरी आधीपासूनच त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येत असल्या, तरी लोक यावर विश्वास ठेवत नव्हते. घटस्फोटानंतर बऱ्याच दिवसांनी अभिनेत्री समंथाने याबद्दल माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली होती. मात्र, नागा चैतन्यने याबद्दल बोलणे टाळले होते. आता पहिल्यांदाच अभिनेता नागा घटस्फोटाच्या निर्णयावर सविस्तरपणे एका मुलाखतीत बोलताना दिसला आहे.

लवकरच नागा चैतन्यचा ‘बंगाराजू’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे, ज्याच्या प्रमोशनमध्ये तो सध्या व्यस्त आहे. याच दरम्यान एका मुलाखतीत त्याला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी त्याने याबद्दलचा खुलासा केला आहे. यावेळी तो म्हणाला की, “वेगळे होणे चांगले आहे, हा तिच्या वैयक्तिक आनंदासाठी घेतलेला एक घरगुती निर्णय आहे. ती आनंदी आहे, तर मी आनंदी आहे. यासाठी घटस्फोट हा योग्य निर्णय आहे.” नागा चैतन्यच्या या वक्तव्याने चाहते माञ चांगलेच गोंधळले आहेत.

हेही पाहा- अभिनेता शाहिद कपूरला आहेत ३ आई आणि ३ बाप

घटस्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट
समंथा आणि नागा चैतन्यने आपल्या मर्जीने घरच्यांच्या परवानगीनंतर गोव्यामध्ये २०१७ साली संसार थाटला होता. त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. कारण पाण्यासारखा पैसा खर्च करत मोठ्या थाटामाटात हा लग्नसोहळा संपन्न झाला होता. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते, जे त्यांच्या फोटोंमधून स्पष्ट दिसत होते. परंतु त्यांच्याबद्दल सप्टेंबरमध्ये आलेल्या बातम्यांनी सगळ्यांना धक्का बसला होता. ऑगस्ट, सप्टेंबरमध्येच त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. ऑक्टोबर येईपर्यंत या बातमीवर शिक्कामोर्तबही झाले. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाआधीच समंथा आणि नागा चैतन्यने घटस्फोटाचा निर्णय जाहीर करून सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. परंतु दोघांनाही हा निर्णय का घ्यावा लागला हे अद्याप समजले नाही. त्यांनी आणि त्यांच्या कुंटुबीयानीही याबद्दल भाष्य करणे टाळले आहे.

समंथा आणि नागा चैतन्यचे चित्रपट
समंथा आणि नागा चैतन्य अनेक चित्रपटात एकत्र झळकले आहेत. त्यामध्ये ‘मजिली’, ‘ये माया चेवासे’, ‘मनम’, ‘ओह! बेबी’, ‘महानती’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा