Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड आयच्या गावात! जेवढे घालवले, तेवढेही नाही मिळाले; ‘या’ सिनेमांनी निर्मात्यानाही केले कंगाल

आयच्या गावात! जेवढे घालवले, तेवढेही नाही मिळाले; ‘या’ सिनेमांनी निर्मात्यानाही केले कंगाल

सध्या सुरू असलेल्या २०२२ या वर्षातील सुरुवातीचे ६ महिन्यांनी आपला निरोप घेतला आहे. तसेच, सातव्या महिनाही जवळपास अर्धा संपला आहे. अशामध्ये यावर्षी प्रदर्शित झालेल्या सिनेमांमध्ये हिटपेक्षा जास्त संख्या फ्लॉप सिनेमांचीच आहे. त्यामुळे असेही म्हटले जात आहे की, बॉलिवूडसाठी हे वर्ष फार काही चांगले गेले नाहीये. मात्र, बॉलिवूडसाठी जरी हे वर्ष चांगले गेले नसले, तरीही दाक्षिणात्य सिनेमाला या वर्षात सुगीचे दिवस आले आहेत. कदाचित भारतीय प्रेक्षक बॉलिवूडपेक्षा टॉलिवूड सिनेमे पाहण्यास जास्त प्राधान्य देत आहेत. त्यामुळे हिंदी सिनेमे बॉक्स ऑफिसवर तोंड घशी पडत आहेत.

द काश्मीर फाईल्स‘, ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि ‘भूल भुलैय्या २‘ हे सिनेमे वगळले, तर ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अजूनही कमाई करतोय. मात्र, जे सिनेमे अर्ध्या वर्षात प्लॉप ठरले आहेत. त्या सिनेमांवर टाकलेली एक नजर…

झुंड
महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या झुंड (Jhund) या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर खास कमाल करता आली नाही. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त १६ कोटी रुपयांची कमाई केली. हा सिनेमा सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे, ज्यांनी स्लम सॉकर नावाच्या एका बेकायदेशीर संस्थेची स्थापना केली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते.

अटॅक
अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) याचे अधिकतर सिनेमे बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहेत. मात्र, त्याच्या ‘अटॅक’ (Attack) या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली नाही. या सिनेमाने फक्त १८ कोटींची कमाई केली. विशेष म्हणजे, हा सिनेमा ८० कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला होता.

जर्सी
सुपरस्टार शाहिद कपूर (Shahid Kapoor) याच्या ‘कबीर सिंग’ (Kabir Singh) या सिनेमाला ज्याप्रकारे प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले, तसे प्रेम त्याच्या ‘जर्सी’ (Jersey) या सिनेमाला मिळाले नाही. या सिनेमाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या, पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही. सिनेमाने फक्त २० कोटींची कमाई केली. या सिनेमाच्या निर्मात्यांना वाटले होते की, हा सिनेमा खूप चांगली कमाई करेल, पण हा सिनेमा सपशेल फ्लॉप ठरला. या सिनेमाला बनवण्यासाठी ३५-४० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

बधाई दो
तसं पाहिलं, तर राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांची जोडी शानदार सिनेमे देण्यासाठी ओळखली जाते. मात्र, त्यांच्या ‘बधाई दो’ (Badhai Do) या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर खास कामगिरी करता आली नाही. या सिनेमाने फक्त २१ कोटी रुपयांची कमाई केली होती. या सिनेमाची निर्मिती ३५ कोटी रुपयांमध्ये झाली होती.

बच्चन पांडे
सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) हा दरवर्षी अनेक सिनेमे घेऊन येत असतो. त्याच्या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसादही मिळत असतो. मात्र, यावर्षी त्याला आपली जादू दाखवता आली नाहीये. त्याच्या ‘बच्चन पांडे’ (Bachchhan Paandey) या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर फक्त ६८.६१ कोटींची कमाई करता आली. त्याच्या सिनेमाचे बजेट हे शंभर कोटींहून अधिक होते. त्यामुळे हा सिनेमा चांगलाच आपटला. या सिनेमात त्याच्यासोबत क्रिती सेनन (Kriti Sanon) ही अभिनेत्री होती.

धाकड
‘पंगा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत (Kangana Ranaut) होय. यावर्षी प्रदर्शित झालेल्या कंगनाच्या ‘धाकड’ (Dhaakad) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांना आवडला होता, पण सिनेमा मात्र जोरात आपटला.

सम्राट पृथ्वीराज
अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या ‘बच्चन पांडे’ या सिनेमानंतर ३०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) हा सिनेमा फ्लॉप ठरला. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर धमाल कामगिरी करता आली नाही. या सिनेमाने जगभरात फक्त ८० कोटी रुपयांची कमाई केली.

जनहित में जारी
अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) हिचा सामाजिक संदेश देणारा ‘जनहित में जारी’ (Janhit Mein Jaari) हा सिनेमादेखील या यादीत सामील आहे. या सिनेमाला प्रेक्षकांची मने जिंकण्यात अपयश आले. १२ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने फक्त ५ कोटी रुपये कमावले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

नेहमी ट्रोल होणाऱ्या राखीला चाहत्यांनी घेतले डोक्यावर, कारण ठरला ‘हा’ एकच व्हिडिओ

अवघ्या १७व्या वर्षी वडील बनले होते दारा सिंग, त्यांच्यासोबत काम करताना अभिनेत्रींचा उडायचा थरकाप

एक-दोन नाही, तर तब्बल आठ भाषा बोलते रणबीरची ‘ही’ अभिनेत्री; लग्नानंतर एका महिन्यातच दिलेली गोड बातमी

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा