Friday, April 4, 2025
Home कॅलेंडर एक दोन नाही तब्बल ४०० चित्रपटात काम करुनही रेखा आजही करत नाहीत ‘ही’ गोष्ट

एक दोन नाही तब्बल ४०० चित्रपटात काम करुनही रेखा आजही करत नाहीत ‘ही’ गोष्ट

बॉलिवूडमधील काना कोपऱ्यात जिच्या सौंदर्याची नशा आजही पसरली आहे, जिच्या अभिनयाचे आजही अनेक दिवाने आहेत, जिच्या अदा आजही चाहत्यांना घायाळ करतात, ती म्हणजे दिग्गज अभिनेत्री ‘रेखा’. आपल्या मनमोहक सौंदर्यमुळे आणि अदाकारीमुळे त्या नेहमीच प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. रेखा यांनी आतापर्यंत 400 पेक्षादेखील जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर मंडळी आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला रेखा यांच्याबद्दल अश्या काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या फारच कमी प्रेक्षकांना आहे.

आपले सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयासाठी नावजलेल्या अभिनेत्री रेखा यांनी 1966 साठी चित्रपटसृष्टीत पाहिले पाऊल ठेवले. 1966 मध्ये साऊथचा चित्रपट ‘रंगुला रत्नम’ या चित्रपटात त्यांनी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. बॉलिवूडमधील त्यांच्या कारकिर्दीला आता 55 वर्ष पूर्ण झाले आहे. रेखा यांनी आतापर्यंत 400 पेक्षाही अधिक चित्रपटामध्ये काम केले आहे.

रेखा यांनी जरी आतापर्यंत 400 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांना स्वत:चा एकही चित्रपट पाहायला आवडत नाही. रेखाला आतापर्यंत उत्कृष्ट अभिनयसाठी 3 वेळा फिल्मफेअर अवॉर्ड, 1 वेळा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार आणि देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सन्मान ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले आहे. एवढं यश मिळून देखील रेखा यांनी स्वतःला कधीच सुपरस्टार असं संबोधलं नाही.

हो गोष्ट त्यांच्या बऱ्याच चाहत्यांना माहिती नसेल की रेखा या फक्त एक चांगल्या अभिनेत्रीच नाही तर एक चांगल्या गायिका देखील आहेत. एका मुलाखतीमध्ये रेखा यांचं हे टॅलेंट प्रेक्षकांसमोर आले होते. त्यांनी तेव्हा ‘मेहंदी हसन’ यांची गजल ‘मुझे तुम नजर से गिरा तो रहे हो’ च्या काही ओळी गुणगुणल्या होत्या. ज्याचा व्हिडीओ आज देखील यूट्यूबवर प्रचंड पाहिला जातो.

हेही वाचा-

शुभमंगल सावधान! पद्मिनी कोल्हापुरेच्या मुलाने ‘या’ निर्मात्याच्या मुलीसोबत थाटला संसार; कलाकारांनी लावली हजेरी

हे देखील वाचा