अनेक लोक स्टार बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत येत असतात. पैसा, संपत्ती आणि नावलौकिकता मिळवण्याचाही त्यांचा हेतू असतो. खूप कमी लोकांना सिनेमात किंवा टीव्ही इंडस्ट्रीत काम करण्याची संधी मिळते. अशात ज्या लोकांना नाव आणि प्रसिद्धी मिळते, ते इंडस्ट्रीत टिकून राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. मात्र, आता असे उदाहरण समोर आले आहे, ज्याने पैसा, संपत्ती आणि प्रसिद्धी असूनही ग्लॅमरस दुनियेला रामराम ठोकला आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणी नसून नुपूर अलंकार आहे. नुपूरने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, ती टीव्ही इंडस्ट्रीला निरोप देत आहे. नुपूर आता आलिशान आयुष्य सोडून झोपडीत राहतेय.
अभिनेत्री नुपूर अलंकार (Nupur Alankar) हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये ती साधवीच्या अवतारात डान्स करताना दिसत आहे. नुपूर आता कलाविश्व सोडून भगवान कृष्णाच्या भक्तीत तल्लीन झाली आहे. लेटेस्ट व्हिडिओत नुपूर कृष्ण मंदिरात भजनावर डोलताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओने चाहत्यांचेही लक्ष वेधले आहे.
View this post on Instagram
झोपडीखाली बसून केले ध्यान
नुपूर अलंकारने या व्हिडिओपूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले होते. या फोटोत ती झोपडीच्या खाली बसून ध्यान लावताना दिसली होती. अभिनेत्रीचा हा अंदाज पाहून चाहतेही हैराण झाले होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, नुपूर आणि तिचा पती मागील 3 वर्षांपासून एकत्र नव्हते. नुपूर आणि तिचा पती मागील अडीच वर्षांपासून वेगळे राहत होते.
अभिनेत्रीच्या मालिका आणि सिनेमे
अभिनेत्री नुपूर अलंकार हिच्याबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘शक्तिमान’, ‘घर की लक्ष्मी बेटियां’, ‘दीया और बाती हम’ आणि ‘राजा जी’ यांसारख्या अनेक मालिकात काम केले होते. तिने अनेक सिनेमातही काम केले होते. त्यामध्ये ‘प्राण जाये पर शान ना जाये’ आणि ‘माय लव्ह’ यांसारख्या सिनेमांचे समावेश आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘तो बकबास शो…’, ‘कॉफी विथ करण’वर संतापले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, ‘माझी सेक्स लाईफ…’
मराठी चित्रपटाचा अटकेपार झेंडा! ‘फोर्ब्स’ने घेतली ‘पल्याड’ चित्रपटाची दखल