Wednesday, March 29, 2023

लोकप्रिय टिव्ही अभिनेत्रीने घेतला संन्यास, २७ वर्षाची यशस्वी कारकिर्द सोडून जाणार हिमालयात

टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकारबाबत (Nupur Alankar) एक मोठी बातमी समोर आली आहे. 27 वर्षे टीव्हीवर आपल्या अभिनयाने लोकांना प्रभावित करणाऱ्या नुपूरने इंडस्ट्रीला अलविदा केला आहे. नूपुरने तिचे ग्लॅमर लाईफ सोडले आहे आणि ती संन्यासी झाली आहे. जाणून घेऊया या अभिनेत्रीचे काय झाले, जिने अभिनय सोडून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. 

नूपुरने अलंकार शक्तीमान, दिया और बाती हम, घर की लक्ष्मी बेटियां यांसारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. अनेक वर्षे टीव्हीवर काम करत असताना नुपूरला ती जी शांतता हवी होती ती मिळाली नाही. ETimes ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, मी फेब्रुवारीमध्ये निवृत्त झाले होते. मी तीर्थयात्रेत व्यस्त आहे आणि गरजूंना मदत करण्याचा निर्णय घेतला. माझा नेहमीच अध्यात्माकडे कल राहिला आहे आणि ते पाळतही आले आहे. त्यामुळे आता मी स्वतःला पूर्णपणे समर्पित केले आहे. माझ्या आयुष्याचा मार्ग बदलणारे गुरू शंभू शरण झा यांच्यामुळे मी धन्य झाली आहे.

टीव्ही अभिनेत्रीतून संन्यासी बनलेली नुपूर मुंबई ते हिमालयाच्या प्रवासाला निघाली आहे. हे एक मोठे पाऊल असल्याचे ती म्हणते. मी माझा मुंबईचा फ्लॅट भाड्याने दिला आहे, जेणेकरून प्रवास आणि मूळ खर्च भागवता येतील. तिच्या तपस्वी लूकबद्दल बोलताना ती म्हणाली,”अनेकांना वाटतं की मी भावनिकदृष्ट्या तुटली आहे आणि आयुष्याला कंटाळून मी हा निर्णय घेतला आहे. पण हे खरे नाही.”

टीव्ही अभिनेत्री नुपूरने 2002 मध्ये अभिनेता अलंकार श्रीवास्तवसोबत लग्न केले. सासरच्या घरी जेव्हा त्यांनी संन्यासी बनण्याची इच्छा सांगितली तेव्हा त्यांना पाठिंबा मिळाला. हिमालयात जाण्यापूर्वी नुपूर पती आणि सासूला भेटायला आली होती. नुपूर सांगते की, तिने नेहमीच चांगली सून बनण्याचा प्रयत्न केला आहे. नूपुरने गेल्या २-३ वर्षात अनेक चढउतार पाहिले, ज्यामध्ये तिची टीम सोबत नेहमीच उभी राहिली. याबद्दल अभिनेत्रीने त्यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’च्या बॉयकॉटवर स्पष्टच बोलला विजय; म्हणाला, ‘फक्त आमिरच नाही, तर हजारो कुटुंब…
चंद्राच्या नजाकतींनी चाहते घायाळ
किसिंग सीनमुळे ‘या’ कलाकारांना मागावी लागलीये पत्नीची हात जोडून माफी, काहींचे तर झाले घर उद्ध्वस्त

हे देखील वाचा