नुकतीच चित्रपट निर्माता अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्यासह दोन सेलिब्रिटींच्या घरावर इनकम टॅक्स डिपार्टमेंटची रेड पडली. यानंतर या सेलिब्रिटींच्या घरात बक्कळ प्रॉपर्टी सापडल्याचे वृत्त आहे. अशातच आता इनकम टॅक्स डिपार्टमेंटने याबाबत मोठा खुलासा केला आहे.
इनकम टॅक्स डिपार्टमेंटने गुरुवारी (४ फेब्रुवारी) बोलताना म्हटले की, ‘तापसी, अनुराग आणि त्याच्या दोन साथीदारांशी जोडलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला. त्यावेळी समजले की, त्यांच्या उत्पन्नात हेरफेर झाले आहेत.’ पुढे त्यांनी म्हटले की, ‘बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या तुलनेत अधिक उत्पन्नही दडपण्यात आले आहे.’
तपासाबद्दल सांगताना इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘प्रॉडक्शन हाऊसचे कर्मचारी जवळपास ३०० कोटी रुपयांची तफावत सांगू शकले नाहीत.’
‘चित्रपट दिग्दर्शक आणि भागधारकांमध्ये फॅंटम फिल्म्सच्या शेअर व्यवहाराची हेराफेरी आणि त्यांच्याकडील मूल्यांकनाशी संबंधित पुरावे सापडले आहेत. त्यामध्ये जवळपास ३५० कोटी रुपयांचा कर आकारण्यात आला आहे. याव्यतिरिक्त तापसीकडून ५ कोटी रुपयांच्या रोख पावतीचा पुरावाही जप्त करण्यात आला आहे,’ असेही अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले.
बुधवारी (३ मार्च) मुंबई आणि पुण्यातील जवळपास ३० ठिकाणांवर रेड पडली होती. रिलायन्स एंटरटेनमेंट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिभाशिष सरकार, सेलिब्रिटी, टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्या केडब्ल्यूएएन आणि एक्सीड यांच्याशी संबंधित मालमत्तांवरही रेड टाकण्यात आली.
वेबसाईट सीएनॉलेज यांच्या मते, तापसी ही दरवर्षी कमीतकमी ४ कोटी एवढी रक्कम तर नक्कीच कमावते. या सगळ्याची आकडेवारी काढली, तर ती दर महिन्याला ३ लाखांपेक्षाही जास्त कमावते. २०१९- २०२० मध्ये तापसी एका चित्रपटासाठी १ ते २ कोटी रुपये चार्ज करत होती. परंतु माध्यमांत आलेल्या काही बातम्यांनुसार ती एका चित्रपटासाठी सध्या ८ कोटी रुपये चार्ज करते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता! अनुराग कश्यप आणि तापसी पन्नुच्या संपत्तीचे आकडे ऐकून तुमचेही फिरतील डोळे
-ओटीटीवरील अश्लील कंटेंटवर सर्वोच्च न्यायालयाची नजर; म्हणाले, ‘पोर्नोग्राफी दाखवली जातेय’
-‘मिल्की’ गाण्यावर सपना चौधरीने लावले ठुमके! गाण्यातील अदा पाहून चाहतेही झाले दंग