फोटोवर जाऊ नका, यांच्यातील वाद वाचून धक्का बसेल! पाहा बॉलिवूडमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे वाद

फोटोवर जाऊ नका, यांच्यातील वाद वाचून धक्का बसेल! पाहा बॉलिवूडमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे वाद


हिंदी चित्रपटांमध्ये आपल्याला बॉलिवूड स्टार्सच्या नवनव्या जोड्या पाहायला मिळतात. सिनेमातही या जोड्यांमध्ये आपल्याला खूप सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळते. परंतु अनेकदा या स्टार्समध्ये वादविवादही होतात. ते इतक्या टोकाला जातात की प्रत्यक्षात यांच्यामध्ये अनेकदा हणामारीही होते.

चला तर मंडळी आजच्या या लेखात अशाच काही कलाकारांच्या जोड्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनी एकत्र काम तर केलं परंतु वाद झाल्यामुळे आज ते एकमेकांचं तोंडही पाहत नाहीयेत.

करीना कपूर खान- बिपाशा बसू
२००१ मध्ये रिलीज झालेला मल्टिस्टारर चित्रपट अजनबीमध्ये करीना कपूर खान आणि बिपाशा बसू यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान करीना आणि बिपाशाची अनेकदा भांडणे झाली. एकदा, एका भांडणाच्या वेळी करीनाने बिपाशाला काळी मांजर म्हटलं होतं.

त्याचवेळी करीनाने बिपाशाचा तत्कालीन बॉयफ्रेंड जॉन अब्राहमचीही खिल्ली उडवली होती. यामुळे तिला बिशापानेही चांगलेच खडसावले होते. या भांडणानंतर पुन्हा दोघींनी एकत्र काम करणं तर सोडाच त्या कुठल्या कार्यक्रमातही एकत्र दिलेल्या नाहीत.

शाहरुख खान- सलमान खान

नव्वदीच्या दशकातील ब्लॉकबस्टर चित्रपट करण- अर्जुनमध्ये सलमान आणि शाहरुख खान यांनी सख्या भावाच्या भूमिका निभावल्या होत्या. सलमान आणि शाहरुख या चित्रपटानंतर एकमेकांचे अगदी जिवलग मित्र झाले होते. त्यानंतर जेव्हा कतरीना कैफच्या वाढदिवसाला शाहरुख खानने सलमानची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायवरून मस्करी केली, जी सलमानला सहन झाली नाही आणि दोघांमध्ये वाद झाला होता.

उपस्थितांनी दोघांमधील वाद त्यादिवशी थांबवला खरा परंतु पुढील काही वर्षे दोघांनीही एकमेकांचं तोंडही पाहिलं नव्हतं. आता पुन्हा दोघांमधील संबंध हे पूर्ववत झाले आहेत. दोघेही एकमेकांच्या चित्रपटात पाहुण्या कलाकारांची भूमिका साकारू लागले आहेत. पुन्हा हे दोघे केव्हा एकत्र मुख्य भूमिकांमध्ये पाहायला मिळतील याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

कंगना रनौत- हृतिक रोशन

क्रिश ३ या चित्रपटात दिसलेली जोडी हृतिक रोशन आणि कंगना रनौत या दोघांमधील रिलेशनवरून खूप चर्चेत होती. परंतु काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद होऊ लागले. दोघांमध्येही वाद होऊ लागले. कंगना ने हृतिक चे सर्व ईमेल सार्वजनिक करत त्याच्यावर खूप गंभीर आरोप केले होते. परंतु हृतिकने या प्रकरणावर आजतागायत कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

शाहरुख खान – शिरीष कुंदर

चित्रपट रा-वनच्या प्रदर्शनानंतर शाहरुख खान आणि फराह खानचा पति शिरीष कुंदरामध्ये एका पार्टीमध्ये बाचाबाची झाली. ही फक्त शाब्दिक बाचाबाची नव्हती तर शाहरुखने शिरीषवर पार्टीत सगळ्यांसमोर हात देखील उचलला होता. पार्टीतील उपस्थितांच्या म्हणण्यानुसार, शिरीषने रा-वन चित्रपटाची खिल्ली उडवली होती.

शिरीष यावेळी म्हणाला होता की, ‘रा-वन चित्रपट हा फक्त १५० कोटींचा एक फटाका होता.’ बस्स याच विधानाचा शाहरुखला राग आला आणि त्याने शिरीषच्या चेहऱ्यावर फाईट मारली होती. या भांडणानंतर शाहरुख आणि फराह खान यांची मैत्री सुद्धा संपली होती. आता हल्ली ते एकत्र काम तर करतात परंतु पूर्वीसारखी मैत्री मात्र त्यांच्यात उरलेली नाही.

करण जौहर- कंगना रनौत

रंगून चित्रपटानंतर करण जौहरच्या चॅट शो मध्ये कंगना पाहुणी म्हणून गेली होती. कंगना रनौत करणला त्याच्या तोंडावरच नेपोटिझमचे झेंडे रोवणारा म्हणाली होती. शोमध्ये तर कारणनेने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही परंतु हे प्रकरण पुढे जाऊन फार मोठं झालं. पुढे बऱ्याच प्रमोशनल इव्हेंट्समधून कंगना आणि करणने एकमेकांवर चिखलफेक केली होती. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर देखील कंगनाने करणवर बॉलिवूडमध्ये नेपोटीझम चालवत असल्याचे आरोप केले होते.

सलमान खान – विवेक ओबेरॉय

ऐश्वर्या रायने सलमान खानसोबत ब्रेकअप केल्यानंतर विवेक ओबेरॉय तिच्यासोबत डेट करत होता. याच गोष्टीचा राग येऊन सलमान खानने विवेकला जवळपास ४१ फोन केले, ज्यात सलमानने मद्यधुंद असताना विवेकला जिवे मारण्याची धमकीही दिली होती. सलमानवर नाराज असलेल्या विवेकने पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्याने धमक्या व कॉल उघडकीस आणले.

तेव्हापासून दोघांमध्ये वैर सुरु झालं आहे ते आजतागायत सुरू आहे. यानंतर विवेकची बॉलिवूड कारकीर्दच जवळपास संपुष्टात आल्यासारखं झालं होतं आणि यासाठी प्रत्येकजण सलमानलाच जबाबदार धरत होता. सलमानने क्षमा केली नसली तरी विवेकने नंतर सलमानची माफीही मागितली होती.

सलमान खान – अरिजीत सिंग

एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान अरिजीत सिंगने स्टेजवर सलमानकडून पुरस्कार घेताना त्याच्या चित्रपटांची थट्टा केली. त्यावेळी सलमानने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, परंतु नंतर दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले. सलमान खानचा चित्रपट सुलतानचे ‘जग घुमेया’ हे गाणं अरिजीत सिंगने पूर्वी गायलं होतं.

परंतु, वादामुळे सलमानने त्याचं गाणं नाकारलं आणि राहत फतेह अली खान यांच्या आवाजात नविन गाणं रेकॉर्ड करत ते चित्रपटात वापरलं. याचा अरिजीतला खूप राग आला. सलमान खान आणि त्याच्यातील मतभेदांबद्दल अरिजीतने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची भूमिका मांडली होती आणि सलमानची घडल्या प्रकाराबद्दल क्षमा देखील मागितली होती. परंतु सलमानने आजतागायत अरिजीतला माफ केलेलं नाही.


Leave A Reply

Your email address will not be published.