Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड सोशल मीडिया पोस्टवरून सेलिब्रिटी कमवतात लाखो- करोडो; प्रियंकाचा रेट २ कोटी, तर इतरांचा घ्या जाणून

सोशल मीडिया पोस्टवरून सेलिब्रिटी कमवतात लाखो- करोडो; प्रियंकाचा रेट २ कोटी, तर इतरांचा घ्या जाणून

नुकतेच बऱ्याच विदेशी स्टार्सच्या ट्वीटमुळे एक महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली. काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलनावर मौन बाळगून असलेले कलाकार आता हळूहळू आपले मौन सोडत आहेत. स्टार्सचे ट्वीट हा या चळवळीचा नवीन मुद्दा आहे. परंतु आपणास हे माहित आहे का, ज्यांचे ट्वीट किंवा इंस्टाग्राम पोस्टने वातावरण बदलते अशा कलाकारांना पैसे देऊन आपण स्वत:नुसार काहीही ट्वीट करून घेऊ शकता. तर चला तपशीलवार समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.

जे लोक सेलिब्रिटींचे ट्वीट रिट्वीट करतात आणि लाखो लाईक्स देण्यासाठी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टवर क्लिक करतात त्यांना हे माहिती नसेल की, त्यांचे प्रत्येक रिट्विट आणि प्रत्येक लाईक सेलिब्रिटींची तिजोरी भरत असतात. सध्या सुपर सेलिब्रिटी रिहाना चर्चेत आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, प्रियंका चोप्रा एखाद्या वस्तु, व्यक्ती किंवा ठिकाणांबद्दल प्रायोजित इंस्टाग्राम पोस्ट लिहिण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपये घेते. फोर्ब्सने तिला सर्वात श्रीमंत इंस्टाग्रामर असल्याचे सांगितले आहे.

ही तर सर्वात श्रीमंत प्रभावकाबद्दलची (Influencer) बाब झाली. परंतु स्थानिक ब्रँड्सद्वारे ट्वीट करुन लाखो कमावणारे स्थानिक सोशल मीडिया प्रभावकही काही कमी नाहीत. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेड इन इंडिया’ या मोहिमेनंतर मिस महाराष्ट्र बनलेली अभिनेत्री नैना मुके हिच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. ती तिच्या एका सोशल मीडिया पोस्टसाठी पाच लाख रुपये घेते. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की बर्‍याच वेळा हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेत्रींनाही ही रक्कम मिळत नाही. नैना मुके ही सोशल मीडियावरील स्टार्सच्या बदलत्या नशिबीचे नवे उदाहरण आहे. एका मालिकेत तिने देवी लक्ष्मीची भूमिका साकारल्यामुळे तिचेहीे नशिब बदलले आहे.

सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून पैसे कमावण्यात विराटला नाही टक्कर
परंतु असेही काही लोक आहेत ज्यांचे नशीब खेळांमध्ये बदलले. उदा., भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली. भलेही रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे सोशल मीडियावर प्रथम क्रमांकाचे ‘पावर कपल’ असतील. मात्र, सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून पैसे कमावण्याबाबत विराट कोहलीला टक्कर नाही. प्रियंका चोप्रानंतर तो दुसऱ्या क्रमांकाचा महाग प्रभावशाली व्यक्ती आहे. हूपर मुख्यालयाच्या इंस्टाग्राम रिच लिस्टमध्ये सामील झालेला विराट त्याच्या इंस्टाग्राम पोस्टसाठी प्रत्येकी दीड कोटी रूपये घेतो.

जर तुम्हाला वाटत असेल की, हे सर्व पैशाच्या मागे धावणारे सेलिब्रिटीच करतात, तर जरा थांबा. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चनही पैसे घेऊन सोशल मीडियावर पोस्ट करतात. त्यांच्या एका पोस्टची किंमत पन्नास लाख रुपयांपर्यंत असल्याचे म्हटले जाते. आलिया भट्ट आणि शाहरुख खान देखील चित्रपटसृष्टीतील असे कलाकार आहेत, ज्यांना पैसे देऊन सोशल मीडियावर पोस्टद्वारे कोणत्याही गोष्टीचा प्रचार करता येऊ शकतो. तसेच या दोघांच्या पोस्टची किंमत जवळपास एक कोटी रुपयांपर्यंत असू शकते.

सोशल मीडिया पोस्टचे दर असे निर्धारित केले जातात
सोशल मीडिया प्रभावकांच्या सोशल मीडिया पोस्टचे दर त्यांच्या फॉलोअर्सवर निर्धारित केले जातात. त्यांच्या पोस्टवर किती लोक पोहचली आहेत (लाईक, रिट्विट, शेअर किंवा कमेंट) हे देखील पाहिले जाते. अनुराग कश्यप सारखे दिग्दर्शक नवीन कलाकार किंवा दिग्दर्शकांसाठी निशुल्क ट्वीट करत असले, तरी सोशल मीडियावर एकेकाळी खूप प्रभावी ठरलेल्या अनुरागचा प्रभाव आता कमी झाला आहे.

रात्रंदिवस सोशल मीडियावर सक्रिय असणारे इतर सर्व दिग्दर्शक व कलाकार प्रत्यक्षात त्यांचा दर वाढविण्याचा प्रयत्न करत असतात. जेणेकरून सोशल मीडियाचे व्यवस्थापन करणार्‍या कंपन्या त्यांच्या ट्वीट्स किंवा इंस्टाग्राम पोस्टच्या दरात वाढ करतील.

हेही वाचा-

शेतकरी आंदोलनावर ट्विट करत संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारी रिहाना आहे तरी कोण?

विराट आणि अनुष्कासोबतच ‘या’ कलाकारांच्या मुलांची नावंही आहेत चर्चेत, जाणून घ्या ‘वामिका’पासून ‘तैमूर’पर्यंतच्या नावांचा अर्थ

आनंदाची बातमी! विराट- अनुष्काने मुलीसोबतचा पहिला फोटो केला शेअर, सांगितले मुलीचे नाव

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा