Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

अनुष्का शर्मापासून ते रणबीर कपूरपर्यंत, ‘या’ कलाकार मंडळींना वानखेडेंनी धरलं होतं धारेवर

समीर वानखेडे सध्या बरेच चर्चेत आहे. आर्यन खान अं’मली प्रकरणात वानखेडे यांनी कोणापुढेही न झुकण्याचा निर्णय घेतला आहे. पण आर्यन हा एकमेव बॉलिवूड सेलिब्रिटी नाही, ज्यावर समीर वानखेडेंनी कारवाई केली आहे. याआधीही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी वानखेडेंच्या रडारखाली आले आहेत. इतकंच नाही तर समीर वानखेडे बॉलिवूडमध्ये आधीच प्रसिद्ध आहे. वास्तविक, वानखेडे हे एनसीबीपूर्वी विमानतळावर कस्टम विभाग, सेवाकर विभागात होते. यादरम्यान अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींशी त्यांचा आमनासामना होत राहायचा. या कलाकारांची तासंतास चौकशी करून, त्यांच्या सामानाची तपासणी करण्यात वानखेडे प्रसिद्ध आहेत. त्यांनी या बॉलिवूड सेलिब्रिटींना मोठा दंडही ठोठावला आहे. आज या लेखात जाणून घेऊया की, कोण आहेत ते बॉलिवूड कलाकार ज्यांच्याशी समीर वानखेडेंनी घेतलाय पंगा…

शाहरुख खान
आर्यन खानचे वडील शाहरुख खान हा या आधीही समीर वानखेडेसोबत वादात अडकला आहे. २०११ मध्ये शाहरुख खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला वानखेडेंनी विमानतळावर थांबवले होते. हॉलंड आणि लंडनमधून सुट्टी घालवून शाहरुख मुंबईला परतला होता. शाहरुखची बॅग तपासल्यानंतर वानखेडेंनी त्याला १.५० लाखांचा दंड ठोठावला होता. (from shahrukh to ranbir kapoor sameer wankhede has screwed up these bollywood celebs)

अनुष्का शर्मा
साल २०११ मध्ये समीर वानखेडेंनी मुंबई विमानतळावर अनुष्का शर्माचेही सामान तपासले होते. अनुष्काकडे डायमंड ब्रेसलेटसह एक नेकलेस, कानातले आणि दोन महागडी घड्याळं सापडली होती. या घड्याळांची किंमत ३५ लाख रुपये होती. ११ तासांच्या चौकशीनंतर अनुष्का शर्माला विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली.

रणबीर कपूर
साल २०१३ मध्ये रणबीर कपूरला विमानतळावर जवळपास ४० मिनिटे थांबवण्यात आले होते. वानखेडेंच्या टीमने सामानाची तपासणी केली असता, रणबीरकडून अघोषित महागडे परफ्यूम, कपडे आणि बूट सापडले होते. त्यानंतर त्याच्यावर ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

कॅटरिना कैफ
साल २०१२ मध्ये जेव्हा कॅटरिना मुंबई विमानतळावर पोहोचली. तेव्हा ती कोणतेही सामान न घेता बाहेर आली होती. यानंतर तिचे दोन सहाय्यक तिचे सामान घेण्यासाठी विमानतळावर परत आले. जिथे वानखेडेंच्या टीमने त्यांना ताब्यात घेतले. कॅटरिनाच्या सामानात एक आयपॅड, ३० हजार रुपये रोख आणि व्हिस्कीच्या २ बाटल्या सापडल्या होत्या. तिला परकीय चलन नियमन कायद्यांतर्गत १२,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

बिपाशा बासू
लंडनहून परतल्यानंतर बिपाशा बासूला वानखेडेंच्या टीमने मुंबई विमानतळावर थांबवले होते. बिपाशा बासूने तिच्या ६० लाखांच्या मौल्यवान वस्तूंची माहिती दिली नाही. त्यानंतर तिला १२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

अनुराग कश्यप
साल २०१३ मध्ये समीर वानखेडे हे सेवाकर विभागात उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यानंतर कर गुंतवणुकीमुळे अनुराग कश्यप यांना ५५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर त्यांचे खातेही सील करण्यात आले होते.

यांच्याशिवाय या यादीत विवेक ओबेरॉय, रिया चक्रवर्ती, अरमान कोहली, दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांच्यासह अनेक कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. यांच्यासोबत समीर वानखेडेंनी वेगवेगळ्या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आम्हाला मारून टाकण्याच्या धमक्या येतायेत…’, पत्रकार परिषदेत क्रांतीने केला पती वानखेडेंच्या आरोपावर पलटवार

-भ्रष्टाचारांच्या आरोपांमध्ये दिल्लीला पोहचले वानखेडे; ‘कामानिमित्त आलो आहे’, म्हणत दिले स्पष्टीकरण

-वानखेडेंवर लावले जातायेत खंडणीचे आरोप, अभिनेत्री क्रांती रेडकरने पोस्ट करून अप्रत्यक्षपणे मांडली पतीची बाजू

हे देखील वाचा