Monday, June 17, 2024

Mahashivratri 2022 | ‘शिवाय’पासून ते ‘बाहुबली’पर्यंत, ‘या’ चित्रपटांत घडतं महादेवाच्या शक्तीचं दर्शन

चित्रपट भले आजच्या काळातला असो किंवा ९०च्या दशकातला असो, बॅालिवूड प्रेमकथेसाठी ओळखले जाते. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’पासुन ते ‘आशिकी’पर्यंत अनेक प्रेमकथांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. परंतु या सर्वांमध्ये धर्मावर आधारितही अनेक चित्रपट बनवले गेले आहेत. ज्यामध्ये देवावरची श्रद्धा आणि विश्वास दाखवण्यात आले आहे. आज महाशिवरात्री आहे. सर्व लोक शिवभक्तीत रमले आहे. या निमित्ताने आपण जाणून घेऊयात अशा चित्रपटांबाबत, ज्यामध्ये महादेवाचा उल्लेख करण्यात आला आहे.

शिवाय
अजय देवगणचा (Ajay Devgan) ‘शिवाय’ चित्रपट प्रत्येक शिवभक्ताने पाहिला असेलच. या चित्रपटात त्याने एका शेरदिल पर्वतारोहीची भूमिका साकारली आहे. यात त्याच्या पात्राचं नाव ‘शिवाय’ होते. हा चित्रपट २०१६मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते.

केदारनाथ
‘केदारनाथ’ हा चित्रपट भगवान शिवच्या महिमेवर आधारित असून, त्यात केदारनाथ शोकांतिकेचा उल्लेख करण्यात आला आहे. सारा आली खानने (Sara Ali Khan) या चित्रपटातून बॅालिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात तिच्यासोबत सुशांत सिंह राजपूतही (Sushant Singh Rajput) झळकला होता. साराने तिच्या अभिनयाने मने जिंकली होती. हा तिचा पहिला चित्रपट असल्यामुळे, तिला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या सिनेमातील ‘नमो नमो’ हे गाने सर्वांना भगवान शिवशी जोडण्याचे काम करते.

बाहुबली
या यादीत दक्षिणात्य सिनेमाही सामील आहे. या सिनेमाचे नाव ‘बाहुबली’आहे. यात अभिनेता प्रभासचा एक सीन आहे ज्यामध्ये, तो शिवलिंग खांद्यावरून उचलून धबधब्याखाली ठेवतो. या दृश्याने प्रक्षकांचे मन जिंकले. याशिवाय या सिनेमातील ‘कौन है वो कौन है’ आजही प्रेक्षकांचे आवडते गाणे आहे.

सॅटेलाइट शंकर
आदित्य पांचोलीच्या (Aditya Pancholi) ‘सॅटेलाइट शंकर’ या चित्रपटातही भगवान शिववरील श्रद्धा आणि भक्ती दाखवण्यात आली आहे. तुम्हाला फक्त आत्मा आणि परमात्माची भेट घ्यायची आहे,  मग तुम्ही कुठेही जाऊ शकता. हा संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या चित्रपटातून आदित्य पांचोलीने बॅालिवूडमध्ये पुनरागमन केले होते.

ब्रह्मास्त्र
आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचाही समावेश या यादीत होऊ शकतो. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नसला तरी, या चित्रपटात रणबीरच्या पात्राचे नाव शिवा आहे. ज्याच्याकडे काही विषेश शक्ती असेल. या शक्तींना शिवच्या सहवासात पाहिले जात आहे.

 

हे देखील वाचा