इंटरनेटवर धुमाकूळ घालतंय ‘राधे श्याम’चं पोस्टर, तर चाहत्यांना भावला प्रभासचा डॅशिंग लूक

बाहुबली चित्रपटातून जगभर प्रसिद्ध झालेला दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने ‘बाहुबली’ चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जगभरात या चित्रपटाचे कौतुक करण्यात आले होते. त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच व्हायरल होतात. अशातच त्याच्या ‘राधे श्याम’ आगामी चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या या फोटोमध्ये प्रभास डॅशिंग लुकमध्ये दिसत आहे.

प्रभासचा हा फोटो मनोबाला विजयबालन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. शेअर करत त्यांनी असे लिहिले की, “डॅशिंग प्रभासच्या #’राधेश्याम’चा नवीन फोटो.” या फोटोमध्ये तो फिकट निळे जॅकेट, काळी पॅंट घालून, चष्मा लावून मस्त पोझ देताना दिसत आहे. त्याचा हा लुक फॅन्सला खूप आवडला आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.’राधेश्याम’ मध्ये अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. (look of prabhas from radhe shyam went viral on the internet before the teaser)

‘अशी’ आहे चित्रपटाची कथा
हा चित्रपट लव्ह स्टोरीवर आधारित आहे. यात पुजा प्रभाससोबत रोमांन्स करताना दिसणार आहे. राधा कृष्ण कुमार यांनी दिग्दर्शन केले असून, ‘राधेश्याम’मध्ये सचिन खेडेकर, प्रियदर्शी, भाग्यश्री, मुरली शर्मा आणि सत्यन शिवकुमार यांच्याही भूमिका आहेत. ‘राधेश्याम’चे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा चित्रपट १४जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

तसेच प्रभासचे २०२२ मध्ये ‘आधीपुरुष’ चित्रपट येणार आहे. यासोबतच त्याने हिंदी चित्रपट ‘साहो’मध्ये श्रद्धा कपूरसोबत काम केले होते. हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टीने केला होता कास्टिंग काऊचवर मोठा खुलासा, पण काय म्हणाली होती?

-वजन वाढविण्यासाठी एकावेळी तब्बल ४० अंडी खायचा प्रभास, ‘बाहुबली’साठी २०० कोटींच्या ऑफरलाही केलं बाय बाय

-बापरे! एका वर्षात प्रभासने नाकारल्या होत्या, एक- दोन नाही, तर तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांच्या जाहिराती

Latest Post