रिमेक हा शब्द सहसा चित्रपटांच्या बाबतीत सर्वात जास्त ऐकायला मिळतो. अनेक हिंदी चित्रपट हे विविध भाषांतील चित्रपटांचे रिमेक असतात. कधी हॉलिवूडच्या चित्रपटाचे देखील हिंदी किंवा इतर प्रादेशिक भाषांमध्ये रिमेक होतात. परंतू, तुम्हाला माहिती आहे का, भारतामध्ये चित्रपटांसोबत मालिकांचे सुद्धा रिमेक झाले आहेत. अनेक हिंदी मालिकांचा समावेश या यादीत समावेश होतो. पाहा अशाच काही मालिकांची नावे.
द कपिल शर्मा शो- द कुमार्स एट नं 42 :
सोनी टीव्हीचा लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ हा अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे.
या शो मधील अनेक भूमिका ह्या लोकप्रिय झाल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे का, ‘द कपिल शर्मा शो’
हा ब्रिटिश शो ‘द कुमार्स एट नं ४२’ या कार्यक्रमाचा रिमेक आहे.
सन २००१ साली प्रदर्शित झालेल्या या शो मध्ये सूत्रधाराच्या घरात अनेक प्रकारचे लोक येतेय. जसे, म्हातारी आजी, अविवाहित आत्या, जाड शेजारी आदी हे लोक प्रेक्षकांना खूप हसवून हसवून मनोरंजन करायचे. कपिल शर्माचा शो देखील याच कार्यक्रमवरून प्रेरित असल्याचे बोलले जात आहे.

जस्सी जैसी कोई नहीं- अग्ली बैटी
सोनी टीव्हीवर २००३ साली ‘जस्सी जैसी कोई नहीं’ हा कार्यक्रम सुरु झाला होता. या शो मध्ये मोना सिंगने जसप्रीत वालिया हि मुख्य भूमिका निभावली होती. जसप्रीत मध्ये टॅलेंट असूनही फक्त कुरुपतेमुळे तिला चांगले जॉब मिळत. अशी या शो ची कन्सेप्ट होती. ह्या शो चा विषय अमेरिकन शो अग्ली बैटी सारखाच होता.
कुमकुम भाग्य- सेंस एंड सेंसिब्लिटी
सन २०१४ साली सुरु झालेला झी टीव्हीचा हा शो नेहमी टीआरपी मध्ये सर्वात पुढे असतो. पण हा शो देखील इंग्लिश शो सेंस एंड सेंसिब्लिटी च्या शो सारखाच आहे. या शो ची कथा जेन ऑस्टिन की नोवल यावरून घेतली आहे. या हिंदी शो मध्ये सृति झा आणि शब्बीर आहलूवालिया मुख्य भूमिका साकारत आहे.

सुमित संभाल लेगा- एवरीबडी लव्स रेमंड
स्टार प्लसच्या या कॉमेडी शो मध्ये नमित दास आणि मानसी पारीख मुख्य भूमिकेत होते. २०१५ साली सुरु झालेला हा शो खूप हिट झाला. या शो चा विषय इंग्लिश शो एवरीबडी लव्स रेमंड वरून घेतला होता. हा इंग्लिश शो १९९६ मध्ये सुरु झाला होता.

मेरी आशिकी तुमसे ही- वुथरिंग हाइट्स
कलर्स टीव्हीचा लोकप्रिय शो ‘मेरी आशिकी तुमसे ही’ देखील ब्रिटिश शो वुथरिंग हाइट्स वरून घेतला आहे. यात एका अनाथ मुलाला एक श्रीमंत व्यक्ती सांभाळतो. त्याच श्रीमंत व्यक्तीच्या मुलीच्या प्रेमात तो अनाथ मुलगा पडतो, असा विषय होता. या हिंदी शो मध्ये शक्ती अरोरा आणि राधिका मदन यांनी भूमिका साकारली होती.
प्यार की एक कहानी- ट्वाईलाईट
स्टार वन च्या ‘प्यार की एक कहानी’ या सिरिअलचा विषयही ट्वाईलाईटचा हिंदी रिमेक होता. या शो मध्ये सध्या अशा नायिका वैम्पायर असलेल्या नायकाच्या प्रेमात पडते.

बड़ी दूर से आए हैं- द थर्ड रॉक फ्रॉम द सन
सोनी सब टीव्हीवर २०१४ साली सुरु झालेला शो ‘बडी दुर से आए हैं’ हा इंग्लिश शो द थर्ड रॉक फ्रॉम द सन चा हिंदी रिमेक आहे. इंग्लिश शो १९९६ साली सुरु झाला होता. या शो मध्ये एलियनचे कुटुंब एका खास कारणाने पृथ्वीवर येते. असे दाखवले होते.