२०१७ मध्ये आलेल्या फुकरे रिटर्न्स चित्रपटातील बॉबीची भूमिका साकारणारे ओलानोकियोटन गॉलाबो ल्यूकस यांचं दुःखद निधन झालं आहे. या चित्रपटाचा निर्माता फरहान अख्तरने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोबतच ट्विटर हँडलवरून ही बातमी सर्वांना सांगितली. या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी केली होती.
ट्विटरवर या अभिनेत्याचा कृष्णधवल फोटो शेअर करताना फरहानने लिहिलं आहे की, “फुकरे चित्रपटाच्या फ्रँचायझीमध्ये बॉबीची भूमिका साकारणारे प्रिय कलाकार ओलानोकियोटन गॉलाबो ल्यूकस यांचे निधन झाले आहे. त्यांच्या कुटूंबियांबद्दल तीव्र संवेदना… . “
A dear cast member Olanokiotan Gbolabo Lucas, who played the role of Bobby in the Fukrey film franchise, has passed away. Deepest condolences to his family. You will be missed.. RIP. pic.twitter.com/l44qzqa8qb
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) January 16, 2021
‘फुकरे’ चित्रपटात दिलीप उर्फ ‘चूचा’ सिंहची भूमिका साकारणार्या वरुण शर्माने सोशल मीडियावर लुकास यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सहकलाकार गमावल्याबद्दल त्यांनी आपले दुःख व्यक्त केले.
वरुणने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे ती अशी, “जड अंत:करणातून, आम्ही एक महत्त्वाचा सहकलाकार तसेच मित्रदेखील गमावला आहे. याबद्दल माहिती मिळाल्यापासून आम्ही दुःखी झालो आहोत.”

मृगदीपसिंग लांबा दिग्दर्शित फुकरे चित्रपटात अली फजल, पुलकित सम्राट, रिचा चड्ढा, वरुण शर्मा आणि मनजोत सिंग यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटाच्या यशानंतर २०१७ मध्ये फुकरे रिटर्न्स नावाचा सिक्वेल आला.
या विनोदी चित्रपटात सुमारे चार मित्र आहेत, जे विविध मार्गांनी पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. या सिनेमांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. तसेच या स्टारकास्टसोबतच अनेकांच्या लक्षात बॉबीदेखील राहिला हे विशेष!
आज त्याच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर अनेकांनी ट्विटरवर अभिनेते ओलानोकियोटन गॉलाबो ल्यूकस यांच्याकरिता शोक व्यक्त केला. दैनिक बोंबाबोंबतर्फे ओलानोकियोटन गॉलाबो ल्यूकस यांना भावपूर्ण श्रद्धांजली!










