Wednesday, July 3, 2024

‘गाढवाचं लग्न’ नाटकातील गंगीचं दुःखद निधन, अभिनेत्रीने 81 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

मराठी नाट्यसृष्टीमधून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता तमाशा कलावंत प्रभा शिवणेकर यांचे दुःखद निधन झालेले आहे. त्यांनी वयाच्या 81 व्या वर्षी पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर संपूर्ण चित्रपटसृष्टी हळहळ व्यक्त करत आहे.

प्रभा शिवणेकर यांच्यावर मुळशी तालुक्यातील भालगुडी या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. प्रभा शिवणेकर यांनी मराठी रंगभूमीवर गाढवाचं लग्न तसेच झाशीची राणी या नाटकाने खूप प्रसिद्धी मिळवली आहे. गाढवाचं लग्न या नाटकातील त्यांचं गंगी हे पात्र खूप प्रसिद्ध झालं. त्या मराठी रंगभूमीमध्ये तब्बल सात दशके सक्रिय होत्या. अनेक तमाशा फडात देखील त्यांनी काम करून त्यांची लोकप्रियता मिळवलेली आहे.

प्रभा शिवणेकर यांची अभिनयावर खूप चांगली पकड होती. त्यामुळे त्यांनी देशात नाही तर विदेशात देखील नाव कमावले आहे. जपान आणि अमेरिकेतील कलावंत हे प्रभा शिवणेकर यांना भारताच्या पॉलिमुनी या नावाने ओळखायचे. त्यांनी 1950 ते 1980 दरम्यान गाढवाचं लग्न नाटकातील गंगेची भूमिका निभावली होती. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला होता. अशा प्रकारे त्यांनी त्यांचा कार्यकाळ गाजवलेला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

मिस्टर अँड मिसेस माही चित्रपटाची दणक्यात ओपनिंग, पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई
‘या’ वेबसिरीजमध्ये आहे मोठ्या प्रमाणात अश्लील कंटेंट; बघताना एकटेच पाहा

हे देखील वाचा