Wednesday, June 26, 2024

चिन्मय मांडलेकरने हिंदी चित्रपटांना नकार देण्यामागचं सांगितलं कारण; म्हणाला, ‘निर्माते त्यांच्या चित्रपटांमध्ये…’

मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकर याने आपल्या दमदार अभिनया इंडस्ट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले आहे. मराठीच नाही तर हिंदी चित्रपटातही अभिनेत्याने कौतुकास्पद भूमिका निभावल्या आहेत. सध्या अभिनेता आपला नवीन चित्रपट ‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ मुळे खूप चर्चेत आहे. अशातच अभिनेत्याने हिंदी चित्रपट का नाकारलेत ते एका मुलाखतीदरम्यान आपलं मत मांडलं आहे.

चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) आपल्या अभिनयासोबतच लेखन आणि दिग्दर्शनासाठी ओळखला जातो. सध्या अभिनेता ‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ (Gandhi Godse – Ek Yudh) या नवीन चित्रपटामध्ये व्यस्त आहेत अशातच त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान हिंदी चित्रपटांना नकार देण्यामागचं कारण सांगितलं आहे. चिन्मय मांडलेकर म्हणाला की, “तेरे बिन लादेन या चित्रपटामध्ये मी एका पोलिसाची भूमिका केली होती, त्यानंतर मला अशाच भूमिका विचारण्यात आल्या. त्यानंतर मी हिंदी चित्रपटांच्या मागे लागलो नाही. मला असे वाटले की, निर्माते त्यांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच पोलिसाच्या भूमिकेत एक महाराष्ट्रीय म्हणून पाहतात.”

चिन्म पुढे म्हणाला की, “तेरे बिन लादे’ननंतर मी ‘शांघाय’ आणि ‘भावेश जोशी सुपरहिरो’ हे चित्रपट केले. मी मराठी चित्रपटात काम करत राहिलो. नंतर गांधी गोडसे चित्रपट केला. द काश्मीर फाइल्सच्या बरोबरीने काही चांगले वेब शोदेखील केले.”

 

View this post on Instagram

 

चिन्मयने पोलिसांच्या भूमिकेत अनेक चित्रपटांमध्ये आणि वेबसिरिजमध्ये काम केलं आहे. मात्र, हिंदी चित्रपाटंमध्ये त्याला यासारख्याच भूमिकांसाठी काम मनिळू लागलं मग अभिनेत्याला मराठी चित्रपटांमध्ये आवडणाऱ्या भूमिका मिळू लागल्याने त्यामुळे अभिनेता मराठी चित्रपाटांमध्ये जास्त सक्रिय असतो. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामध्ये चिन्मच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुकांचा वर्षाव केला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ज्युलियन सँड्स अमेरिकेमध्ये हायकिंग करताना बेपत्ता
अमृता फडणवीसांचा व्हायरल Video तुम्ही पाहिला असेलच… पण त्यांच्यासोबत नाचणारा तो आहे तरी कोण?

हे देखील वाचा