Wednesday, July 3, 2024

‘गांधी गोडसे’ चित्रपट प्रदर्शनाला काँग्रेस काळात अडचणी आल्या असत्या का? दिग्दर्शक म्हणाले, ‘माझे करिअर…’

बॉलिवूडमधील प्रसिद्द दिग्दर्शक राजकुमार संतोष सध्या आपला आगमी येणार ‘गांधी गोडसे: एक युद्ध‘ या चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या घेऱ्यात अडकला आहे. यामध्ये मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर मुख्य भुमिकेत पाहायला मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला असून यामध्ये दिग्दर्शकांनी चित्रपटाबद्दल माहिती सांगितली आहे.

प्रसिद्ध दिग्दर्श राजकुमार संतोष (Rajkumar Santosh) यांनी नेहमी समाजतील चालू घडामोडी आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारे चित्रपट बनवले आहेत. त्यांच्या चित्रपटांनी अक्षरश: 80चं दशक गाजवलं. अशातच ते पुन्हा एकदा ‘गांधी गोडसे: एक युद्ध'( Gandhi Godse – Ek Yudh) हा नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र, काही नेटकऱ्यांनी या चित्रपटाला काळे झेंडे दाखवले असून चित्रपट विरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. त्यांच्या मते या चित्रपटामध्ये गांधीजींचा मारेकरी नथुराम याचा गौरव असा आरोप केलाय.

चित्रपटाच्या लॉंच सोहळ्या दरम्यान राजकुमार यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, ‘तुम्ही अनेकवर्षांपासून चित्रपट बनवत आहात मात्र, हा विषय तुम्हाला आता का करावासा वाटला? काँग्रेस काळात बनवला असता तर कदाचित तुम्हाला प्रदर्शनात अडथळे आले असते? आज भाजपा, नरेंद्र मोदींचे सरकार तुम्ही घेतलीत?’ यावर दिग्दर्शक म्हणाले की, “माझे करियर तुम्ही पाहू शकता, मी ‘घायल’ बनवला तो अ‍ॅक्शन चित्रपट होता तसे चित्रपट मी पुन्हा बनवू शकलो असतो पण मी ‘दामिनी’ बनवला. तो एक कोर्टरूम ड्रामा होता. महिलांच्या प्रश्नावर मी ‘लज्जा’ नावाचा चित्रपट बनवला.”

 

View this post on Instagram

 

राजकुमार संतोष पुढे म्हणाले की, “मी ‘अंदाज अपना अपना’ हे तर पूर्ण विनोदी चित्रपट होता तो तर मी कोणतं सरकार आहे हे बघून नाही बनवला. मी या चित्रपटाचे लेखक आहेत त्यांनी मला एका नाटकाचा संदर्भ दिला ते नाटक मी जेव्हा वाचलं तेव्हा मला जाणीव झाली की गोडसेंवर अन्याय झाला आहे. त्याने स्वतःला हवाली केले त्याची शिक्षा त्याला मिळाली. मी वेळ किंवा मी कोणत्या पक्षाचं सरकार आहे हे बघून चित्रपट बनवला नाही.”

 

View this post on Instagram

गांधी-गोडसे एक युद्ध या चित्रपटाचे कथा कथन राजकुमार संतोषी यांनी केले असून ए आर रहमान यांनी चित्रपटाला संगित दिलं आहे. हा चित्रपट प्रजासत्तक दिनान निमित्त म्हणजेच गुरुवार (दि, 26 जानेवारी) रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जबरा फॅन! ‘पठाण’ चित्रपटाचं तिकिट मिळत नसल्याने चाहत्यांने थेट शाहरुख खानकडेच घेतली धाव म्हणाला…
‘…हाच माझा धर्म’, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर प्रसाद ओक स्पष्टच बोलला

हे देखील वाचा