Thursday, March 28, 2024

“कारण मी धार्मिक आहे”, कंगना रनौतने ‘राम मंदिर’ मॉडेलवर लावली बोली

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही नेहमी आपल्या वक्तव्यामुळे आणि नवीन येणाऱ्या चित्रपटामुळे चर्चेत असते. ती राजकारणात खूपच सक्रिय असल्याने नेहमी आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर कंगनाचा मोठा चाहतावर्ग आहे. ती नेहमी आपले फोटो शेअर करत असते. मात्र, यावेळेस कंगना चर्चेत येण्याचे कारण वेगळेच आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना मिळालेल्या उपहाराचा लिलाव कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमामध्ये अनेक राजकीय नेता उपस्थित होते. या उपहार लिलाव कार्यक्रमामध्ये कंगनानेही हजेरी लावली होती. त्यामुळे कंगना भलतीच चर्चेत आली आहे. पीएम मोदी यांच्या वाढदिवशी देखिल तिने मोदीचे खूपच कौतुक केले होेते. ती नेहमी त्यांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असते. यावेळेस तिने या कार्यक्रमाचे काही फोटो आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

लिलावाच्या वेळी कंगनानेही ‘राम जन्म भूमि माती’, आणि ‘राम मंदिर मॉडेल’ या दोन वस्तूवर बोली लावली होती. तिने बोली लावत असानाचे तीन फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. एका फोटोमध्ये ती सेल्युट करताना दिसत आहे. दुसऱ्या फटोमध्ये ती राम मंदिराचे मॉडेल बघताना दिसत होती, आणि तिसऱ्या फोटोमध्ये कहीतरी सामान बघताना दिसून येत आहे. हे फोटो शेअर करत असताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “आज मला माननीय प्रधानमंत्री यांच्या विशेष उपहार स्मृती चिन्हाच्या लिलाव कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे सौभाग्य लाभले आहे. मी ‘राम जन्म भूमी माती’ आणि ‘राम मंदिर मॉडेल’चे डिझाईनसाठी बोली लावली होती. हे उत्पन्न नमामी गंगे प्रकल्पाकडे जाईल. चला त्यामध्ये भाग घेऊया. जय हिंद…” असे भले मोठे कॅप्शन देत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

यानंतर कंगनाने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, “कारण मी धार्मिक आहे. म्हणून मी राम जन्म भूमी वर आपली बोली लावली. हा राम मंदिराचा मॉडेल आहे. मी नेहमी विचार करायचे की, या मंदिराचे डिझाईन कसे असेल. हा इथे उपलब्ध होता तर मी याच्यासाठी बोली लावली.” कंगणाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कंगना लवकरच इमरजेंसी या चित्रपटात झळकणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिहारमधील अश्लिलता बंद करण्यासाठी अक्षरा सिंगणे ‘चौसठ जोगीनिया माई’च्या रुपात धारण केले रौद्र रूप
लग्नाच्या चार दिवसांनंतरच ढसाढसा रडलेली ‘ही’ अभिनेत्री, धक्कादायक होतं कारा

हे देखील वाचा