बॉलिवूड कोरिओग्राफर गणेश आचार्य (Ganesh Acharya) सध्या विविध बातम्यांंमुळे सर्वत्र चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप झाला होता. या बातमीने सिने जगतात चांगलीच खळबळ माजली होती. गणेश आचार्य गेल्या काही दिवसांपासून नकारात्मक बातम्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या को-डान्सरने अश्लील कमेंट करणे, अश्लील चित्रपट दाखवणे आणि विनयभंग केल्याचा आरोप केला होता. आता पुन्हा एकदा गणेश आचार्य त्यांच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. ज्यामध्ये ते त्यांची मुलगी सौंदर्यासोबत डान्स करताना दिसत आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
कोरिओग्राफर गणेश आचार्य याच्याप्रमाणेच त्यांची मुलगी सौंदर्या आचार्य नृत्यात पारंगत आहे. गणेश अनेकदा आपल्या मुलीसोबतचे डान्सचे व्हिडिओ वेळोवेळी शेअर करत असतात. सौंदर्याही तिच्या वडिलांप्रमाणेच नृत्यात पारंगत आहे. जेव्हा ही पिता-पुत्रीची जोडी कॅमेऱ्यासमोर येते, तेव्हा त्यांच्या डान्सने सगळेच आश्चर्यचकित होतात. नुकतेच गणेश आचार्यने आपल्या मुलीसोबतचे अनेक डान्स व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ते आपल्या मुलीसोबत रोमँटिक करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यावर लोक जोरदार कमेंट करत आहेत.
हा व्हिडिओ स्वतः गणेशने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये ते वेगवेगळ्या गाण्यांवर आपल्या मुलीसोबत डान्स स्टेप्सवर थिरकताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये गणेश मुलगी सौंदर्यासोबत ‘ऐतराज’ चित्रपटातील ‘ये दिल तुम्हे आ गया’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा भन्नाट डान्स त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडला असून त्यावर लाइक्सचा पाऊस पाडला आहे.
तत्पुर्वी गणेश आचार्यवर अलिकडेच लैंगिक शौषणाचा गुन्हा नोंद झाला होता. नुकतेच अंधेरीच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात गणेश आचार्य यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सह-नर्तकाच्या आरोपांसंदर्भात हे आरोपपत्र २०२० मध्ये दाखल करण्यात आले आहे. गणेश आचार्यच्या सह-नर्तकाने २०२० मध्ये कोरिओग्राफरवर लैंगिक छळ, पाठलाग असे गंभीर आरोप केले होते. पीडितेच्या आरोपानुसार, गणेश आचार्य यांनी तिला २०१९ मध्ये लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. या घटनेच्या ६ महिन्यांनंतर इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोसिएशननेही त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे तिने आपल्या आरोपात म्हटले आहे.
दरम्यान ‘बॉडीगार्ड’, ‘सिंघम’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘हवन कुंड’, ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी गणेश आचार्य ओळखले जातात. गणेश आचार्यने ‘एबीसीडी’ आणि ‘एनी बॉडी कॅन डान्स’ सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. तसेच ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटातील ‘हवन कुंड’ गाण्यासाठी आणि ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ या २०१७ चित्रपटातील ‘गोरी तू लाठ मार’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –