×

भारती आणि हर्षने शेअर केला बाळाचा ‘होमकमिंग’ व्हिडिओ, ठेवलं ‘हे’ गोंडस नाव

अभिनेत्री आणि प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) सध्या मातृत्वाचा आनंद घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भारतीने गोंंडस मुलाला जन्म दिला होता. सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली होती. यानंतर अनेकांनी भारतीवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आता बाळाच्या जन्मापासून रुग्णालयात असलेल्या भारतीला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच भारतीच्या बाळाचे घरी आगमन होत आहे. ज्याचा व्हिडिओ भारतीने आपल्या युट्यूब चॅनेलवर दाखवला आहे. ज्यामध्ये तिने तिच्या मुलाचे नावही सांगितले आहे.

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया सध्या आपल्या छोट्या पाहूण्याच्या आगमनाने खूपच आनंदी आहेत. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया सध्या आपल्या मुलासोबत बराच वेळ घालवत आहेत. भारतीला १० एप्रिल रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यानंतर ती बाळाला घेऊन त्यांच्या घरी गेली. बाळाला घरी घेऊन गेल्यानंतर दोन दिवसांनी भारती सिंगने तिच्या यूट्यूब चॅनलवर एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तिने तिच्या बाळाचे टोपणनाव उघड केले आहे आणि बाळाची खोली देखील दाखवली आहे. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचा हा व्हिडिओ रुग्णालयातून बाळाला घेऊन घरापर्यंतचा आहे.

या व्हिडिओमध्ये भारती आई बनण्याचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. यासोबतच भारतीने “हर्ष बाळाला त्यांच्या मांडीवर घेऊन तासनतास पाहत असतो असा गोड खुलासा केला आहे. तुमच्या सर्व प्रार्थनांचाच हा प्रभाव झाला आणि सर्व काही ठीक झाले.” असे म्हणत भारती सिंगने चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत. आपल्या बाळाच्या आगमनानंतर आयुष्यात झालेले बदलही तिने या व्हिडिओत सांगितले आहेत. ज्यामध्ये ती म्हणते की, “जेव्हापासून ती आई झाली आहे, तेव्हापासून ती सर्व काही विसरली आहे. मला फक्त तेच आठवते. मी डोळे बंद केल्यावर मला बाळाचा चेहरा दिसतो. बाळाचे नाव आम्ही गोला ठेवले आहे. मी आणि हर्ष त्याला या नावाने हाक मारतो कारण तो गोलुमोलूसारखा आहे, म्हणून आम्ही त्याला गोला म्हणतो.”

दरम्यान या व्हिडिओमध्ये नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या बाळाच्या खोलीची झलकही दाखवली. व्हिडिओमध्ये भारतीचे संपूर्ण घर निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या फुग्यांनी सजवलेले दिसत आहे. यासोबतच घरात अनेक ठिकाणी अनेक फुगे दिसले ज्यावर बेबी बॉय असे लिहिले आहे. यासोबतच बेबी रुमची झलक दाखवण्यात आली, ज्यामध्ये बाळाच्या पलंगावर मऊ खेळणी दिसत आहेत. एकूणच आपल्या या बाळाच्या आगमनाने भारतीच्या चेहऱ्यावर झालेला आनंद स्पष्ट दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

Latest Post