Thursday, April 25, 2024

Dehati Disco | ‘या’ व्यक्तीला गुरू मानतो गणेश आचार्य, चित्रपटाचा ट्रेलरही त्याच्याच हातून केला रिलीझ

गणेश आचार्य (Ganesh Acharya) हा बॉलिवूड जगतातील सर्वात लोकप्रिय कोरिओग्राफर म्हणून ओळखला जातो. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्याने आपल्या नृत्यदिग्दर्शनाची छाप पाडली आहे. त्यामुळेच त्याच्या नृत्यदिग्दर्शनाचे नेहमीच कौतुक होताना दिसत असते. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या पुष्पा चित्रपटातील ‘उ अंटावा’ गाण्याचे दिग्दर्शनही गणेशाचार्यनेच केले होते. नृत्यदिग्दर्शनात आपली छाप पाडल्यानंतर आता तो लवकरच अभिनेता म्हणून पडद्यावर दिसणार आहे. त्याच्या ‘देहाती डिस्को’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीझ झाला असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. हा ट्रेलर अभिनेता गोविंदाने (Govinda) लॉन्च केला आहे. कारण आपल्या यशाचे सगळे श्रेय गोविंदाला जाते, असे गणेश आचार्यचे म्हणणे आहे. काय आहे याचे नेमके कारण चला जाणून घेऊ.

प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला. तो चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणूनही आला. ज्युनियर आर्टिस्ट म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये सुरुवात केली. नंतर डान्सर आणि नंतर डान्स मास्टर झाला. गणेश आचार्यने अनेक चित्रपटांची कोरिओग्राफी केली असून, यातील बहुतांश चित्रपट गोविंदासोबत आहेत. त्यामुळेच आपल्या यशात गोविंदाचा मोठा वाटा आहे, असे तो मानतात. गणेश म्हणतो, “मी जेव्हा डान्स करायचो तेव्हा माझी बहीण म्हणायची, तुझी स्टाइल गोविंदाशी जुळते, त्याला भेट. माझ्या बहिणीच्या सांगण्यावरून मी गोविंदाला भेटलो आणि भेटीने माझे नशीब बदलले.” यामुळेच गणेश आचार्यच्या चित्रपटाचा ट्रेलर गोविंदाच्या हस्ते लॉन्च करण्यात आला.

आपला शिष्य गणेश आचार्य हिरोच्या भूमिकेत असल्याने आनंद व्यक्त करताना  गोविंदा म्हणाला, ‘राजकारणातून निवृत्त होऊन १७ वर्षे झाली आहेत. आज पहिल्यांदाच मी एवढं लांबलचक भाषण देत आहे. दरम्यान, अनेक स्टार बनले. माझी आई निर्मला देवी यांच्या कृपेने आणि गुणवत्तेने मी जेव्हा चित्रपटात प्रवेश केला तेव्हा मला कधीच वाटले नव्हते की मी स्टार होईल. माझ्यात कल्पनाशक्ती होती आणि मी स्टार झालो. खूप स्टार्स आले पण मी माझ्या कल्पनेला आणि जिद्दीला चिकटून राहिलो. मला दाक्षिणात्य चित्रपट आवडतात आणि आज बॉलिवूडला दक्षिणेकडून खूप आशीर्वाद मिळत आहेत. बॉलिवूडमध्ये डंका वाजवणारे अनेक स्टार्स आहेत. दक्षिणेतील त्या स्टार्सप्रमाणे गणेश आचार्यही यशस्वी आहेत, असा माझा आशीर्वाद आहे.”

याबद्दल पुढे बोलताना गोविंदा म्हणतो की, “ज्याचे मन आणि कल्पनाशक्ती चांगली आहे तो नक्कीच हिरो होईल. गणेश आचार्य मनाने खूप चांगला आहे. अभिनेता बनण्याची त्याची कल्पकता होती, म्हणून आज तो बनला आहे. दक्षिणेतील इतर स्टार्सप्रमाणेच स्टार बनणे हा माझा आशीर्वाद आहे. चांगला काळ आला की वास्तुदोष, शब्ददोष, क्रियादोष यापैकी काहीही उरले नाही. गणेश आचार्यांचा दिवसही आला आहे. भगवान भोलेनाथ सर्व दोष दूर करून अभिनय क्षेत्रात यशस्वी व्हावेत हीच सदिच्छा.” आता पहिल्यांदाच गणेश आचार्य चित्रपटात अभिनय करणार असल्याने त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा