×

अक्षय कुमारनंतर ‘केजीएफ’ स्टार यशला मिळाली पान मसाल्याची ऑफर, अभिनेता म्हणाला…

बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) काही दिवसांपूर्वीच एका पान मसाल्याची जाहिरात केल्याने चांगलाच वादात सापडला होता. अशा प्रकारची जाहिरात केल्याने नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली होती. यामुळेच अक्षय कुमारने आपल्या चाहत्यांंची जाहीर माफी मागत या जाहिरातीचा करारही रद्द केला होता. या बद्दलची सिने जगतात चांगलीच चर्चा  रंगली होती. आता केजीएफ स्टार यशनेही (Yash) कोट्यवधी रुपयांची पान मसाल्याची जाहिरात नाकारल्याची माहिती समोर आली आहे. 

सध्या मनोरंजन जगतातील मोठमोठे कलाकार पान मसाल्याच्या जाहीराती करतात, ज्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारवरही यावरून चौफेर टीका झाली होती. यामुळे अक्षयने आपल्या चाहत्यांची माफीही मागितली होती. आता ‘केजीएफ’ सुपरस्टार यशने पान मसाला आणि वेलचीच्या ब्रँडसाठी करोडो रुपयांची जाहिरातीची ऑफर नाकारल्याची बातमी समोर आली आहे. यशसाठी एंडोर्समेंट डील हाताळणारी एजन्सी एक्सीड एंटरटेनमेंटने या बातमीला दुजोरा दिला आहे. “पान मसाला आणि अशा उत्पादनांचा लोकांच्या आरोग्यावर खूप हानिकारक परिणाम होतो.” असे स्पष्टीकरणही यशच्या टीमकडून देण्यात आले आहे.

या गोष्टींच्या वापरामुळे लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. यशने घेतलेला हा एक अतिशय चांगला आणि समंजस निर्णय होता. यशने असा करार नाकारला आहे, जो त्याच्यासाठी वैयक्तिकरित्या खूप फायद्याचा होता. त्याचे फॉलोअर्स, चाहते आणि गोष्टींमधली त्याची आवड लक्षात घेऊन त्याने हा निर्णय घेतला आहे. देशभरातील त्याची लोकप्रियता पाहता, त्याच्या लोकप्रियतेद्वारे योग्य प्रकारचा संदेश देण्यासाठी आम्हाला उपयोग करून घ्यायचा आहे. चांगल्या गोष्टींचा प्रचार करायचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post