Tuesday, July 9, 2024

सलमान खानची हत्या करण्यामागे नक्की कोणता उद्देश आहे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईंचा? घ्या जाणून

सगळ्यांनाच सलमान खानच्या काळ्या हरणाच्या केसबद्दल माहित आहे. त्याच प्रकरणामुळे सलमान खान गँगस्टर लोकांच्या निशाण्यावर आला आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईंने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. ज्यात त्याने सलमान खानला माफी माफ नाहीतर परिणाम भोग असे सांगत धमकी दिली आहे. सलमानला मारण्याच्या एका प्रश्नावरून त्याने ही धमकी त्याला दिली आहे. ही धमकी आणि बिश्नोईची मुलाखत समोर ठेवता पोलिसांनी त्याची सुरक्षा वाढवली. सोबतच या मुलाखतीमध्ये पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येविषयी देखील विविध गोष्टींचा उलगडा त्याने केला आहे.

कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने एका मुलाखतीत सलमान खानला त्याच्या काळवीट शिकार प्रकरणावरून पुन्हा एकदा धमकी दिली आहे. प्राप्त माहितीनुसार ही मुलखात समोर आल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये महाराष्ट्र सरकारने सलमानची सुरक्षा वाय प्लस श्रेणीमध्ये अपग्रेड केली होती. या मुलाखतीत बिश्नोई असे म्हटले की सलमानने त्याच्या समाजाला चांगली वागणूक दिलेली नाही. त्याने त्यांच्या परिसरात जात शिकार केली, याप्रकरणी सलमानने माफी मागावी असे बिश्नोईचे म्हणणे आहे.

salman khan dengue
photo courtesy: instagram /salmankhan

बिश्नोई समाजामध्ये झाड, झुडपे, जीव यांना घेऊन अनेक मान्यता आहे. त्याने समाजाचा अपमान केल्याचे यावेळी लॉरेन्सने स्पष्ट केले आहे. राजस्थानमधील बिकानेर येथे त्यांच्या समाजाचे मंदिर आहे, तिथे येऊन त्याने माफी मागावी अन्यथा आम्ही कायद्याच्या विरोधात जाऊन असे काही करू ज्याची कल्पना कोणाला नसेल. त्याच्या मनात लहानापासून सलमानबद्दल राग असल्याचे देखील यावेळी त्याने स्पष्ट केले. त्याने त्यांच्या समाजातील लोकांना पैसेही दिले. प्रसिद्धीसाठी नव्हे तर एका हेतूसाठी ते लोकं त्याला मारतील हे देखील तो म्हणाला.

सलमानला धमकी दिल्याप्रकणी बिश्नोई समाजातील एका व्यक्तीला जेव्हा अटक झाली तेव्हा हा समाज चर्चेत आला. २०१८ साली त्यांनी पहिल्यांदा त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हापासून सलमान खान त्यांच्या निशाण्यावर आहे. १९९८ साली काळवीट हत्येच्या केसमध्ये सलमान खान अडकला. त्याला मारल्याचा बदल लॉरेन्सला सलमान कडून घायचा आहे. बिश्नोई समाजात काळविटाला पवित्र मानले जाते आणि त्याने त्याचीच शिकार केली. म्हणून सलमान खान बिश्नोई समाजाच्या निशाण्यावर आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेत्रीला शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत, कलाकारांकडून काळजी घेण्याचं आवाहन
‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली….,

हे देखील वाचा