सध्या आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटातील आलिया भट्टच्या दमदार लूकने सर्वांना आधीच आकर्षित केले आहे आता चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे जे सध्या तुफान वेगाने व्हायरल होत आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’ 25 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शनाआधीच चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt )गंगुबाईची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित केले असून हे’ ढोलीदा’ गाणे प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. फक्त 2 तासातच या गाण्याला तब्बल 43 हजार वेळा पाहिले गेले आहे. ‘ढोलिदा’ हे चित्रपटातील एक गरबा गाणे आहे ज्यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट ढोलाच्या तालावर डान्स करताना दिसत आहे.
‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटातील या गाण्याच्या प्रदर्शनामुळे अभिनेत्री आलिया भट्ट आनंदून गेली आहे. तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन ” संजय लीला भन्साळीच्या गाण्यात डान्स करण्याचे माझे स्वप्नं पूर्ण झाले.माझे हृदय नेहमी ढोलिदा गाण्यावर धडकत राहील”असा कॅप्शन देत आपला आनंद व्यक्त केला आहे.
संजय लीला भन्साळीने संगीतबद्ध केलेले हे गाणे कुमारने लिहले आहे. या गाण्याच्या तालावर आता सगळेच डान्स करताना दिसतील असेच या गाण्याचे संगीत आहे. यामध्ये कृती महेशने आपल्या अप्रतिम नृत्य दिग्दर्शनाची झलक दाखवली आहे. संजय लीला भन्साळी आणि डॉ. जयंतीलाल गडा यांच्या या बहुचर्चित चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.हा एक बायोग्राफी चित्रपट असून कामाठीपुरामधील वेश्या वस्तीतील गंगुबाईच्या जिवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे लेखन हुसैन जैदी यांनी केले असून चित्रपटात आलिया भट्टसह अजय देवगण, शंतनु महेश, विजय राज यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.
हेही वाचा :










