Saturday, July 6, 2024

गंगूबाईवर भारी पडली ‘रजियाबाई’? विजय राजचं झालं कौतुक, तर आलिया भट्टला म्हटलं जातंय ‘फायर’!

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या बहुप्रतिक्षित ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहते तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच आलियाच्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर अनेकांना आवडला आहे, तर काहींनी नकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. ‘गंगूबाई काठियावाडी’च्या टीझरनंतर आलिया या भूमिकेत बसेल की नाही, अशी शंका होती. मात्र, ट्रेलर आल्यानंतर चाहते तिला ‘फायर’ म्हणत आहेत.

तसेच यात अजय देवगणला (Ajay Devgan) पाहून अनेक चाहत्यांना सुलतान मिर्झाची आठवण झाली, तर विजय राजच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे. मात्र, संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. त्या दृष्टीने हा चित्रपट आणखी चांगला होऊ शकला असता, अशा प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

विजय राजचे केले कौतुक
‘गंगूबाई काठियावाडी’च्या ३ मिनिट १५ सेकंदाच्या ट्रेलरची सुरुवात आलियाच्या पायापासून होते. यानंतर तिच्या हातात वाईन दिसते. पहिला पूर्ण सीन पाहून तुम्हाला असे वाटेल की, निवडणुकीच्या जाहीर सभेचे असे दृश्य तुम्ही यापूर्वीही अनेकदा पाहिले आहे. आलियाने गुजराती उच्चारांसह उच्च पिचमध्ये डायलॉग बोलण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये मराठी टच आहे. या चित्रपटात विजय राजने रजियाबाईची भूमिका साकारली आहे. त्याची स्क्रीन प्रेझेन्स जबरदस्त आहे. सोशल मीडियावरही त्याचे कौतुक होत आहे.

आलियाचे चाहते म्हणाले ‘फूल नाही, फायर आहे’
या चित्रपटात अजय देवगण करीम लालाच्या भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये त्याला पाहून अनेक चाहत्यांना सुलतान मिर्झाची आठवण झाली. कलाकारांच्या प्रवेशापासून ते डायलॉगपर्यंत अनेक शिट्ट्या वाजवणारे क्षण चित्रपटात आहेत. मात्र, ट्रेलरमध्ये असा एकही सीन नाही की, ज्यामुळे तुम्ही वेडे व्हाल. आलियाच्या अभिनयाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

आलियाला फूल समजले होते, ती आग आहे, अशा अनेक युजर्सच्या कमेंट्स येत आहेत. टीझरमध्ये आलियाची मेहनत दिसत आहे. दिसण्यापासून ते बोलण्याच्या पद्धतीपर्यंत तिने काम केले आहे. मात्र, प्रेक्षकांना हा चित्रपट किती आवडतो, हे बॉक्स ऑफिसचे कलेक्शन आल्यानंतरच कळेल. हा चित्रपट २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

‘स्टुडंट ऑफ द इयर’मधून करिअरची सुरुवात करणाऱ्या आलिया भट्टने आतापर्यंत ‘हायवे’, ‘उडता पंजाब’ सारखे अनेक चित्रपट केले आहेत. बहुतांश चित्रपटांमध्ये नवोदित तरुणीच्या स्टाईलमध्ये दिसली असली, तरी ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहून तिच्या करिअरचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचे दिसते. या चित्रपटात आलिया भट्ट गंगूबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिची वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा