नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बॉलिवूडमधून अनेक सुखद आणि आनंददायी बातम्या येत आहे. एकीकडे नवनवीन चित्रपटांच्या घोषणा होत असताना दुसरीकडे अभिनेत्री गौहर खानने देखील एक आनंदची बातमी दिली आहे. लवकरच गौहर आई होणार असल्याचे तिने जाहीर केले आहे. सोशल मीडिया अकाऊंटवरून तिने तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करत एक फोटो पोस्ट केला आहे. डिसेंबर महिन्यात गौहर खानने ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली होती. मात्र पहिल्यांदा तिचा फोटो पोस्ट केला आहे.
गौहरने शेअर केलेला तिचा फोटो गोव्याचा असून, या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर आई होणार असल्याचा ग्लो आणि आनंद स्पष्ट दिसून येत आहे. फोटोमध्ये गौहरने स्ट्रॅपलेस ड्रेस घातला असून, ती एका हाताने तिचे बेबी बंप दाखवत आहे. तिच्या या फोटोवर भरपूर कमेंट्स येत असून तिच्या लूकचे कौतुक देखील होत आहे. गौहर खानने हा फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये उर्दू भाषेत लिहिले, “मा शा अल्लाह ला कुव्वाता इल्ल बिल्लाह” (अर्थात अल्लाहच्या नावासोबत मी अल्लाहवर देखील विश्वास ठेवला आहे. अल्लाहच्या मदतीशिवाय न कोणत्याही गोष्टीपासून वाचण्याची ताकद आहे नाही काही करण्याची हिंमत.)
View this post on Instagram
गौहर खानच्या या पोस्टवर तिचा नवरा आणि कोरिओग्राफर असणाऱ्या जैद खानने कमेंट करत लिहिले, “ब्युटीफुल” गौहरच्या आई होण्याची बातमी जैद आणि तिने एका अनिमेशन रिलच्या मदतीने सोशल मीडियावरून पोस्ट करत दिली होती. गौहर खानने आणि जैदने डिसेंबर २०२० मध्ये लग्न केले होते.
गौहर खान मनोरंजनविश्वात खूप प्रसिद्ध असून तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये सहायक भूमिका केल्या असून, अनेक चित्रपटांमध्ये डान्स नंबर्स केले आहे. तिने ओटीटी प्लॅटफॉर्म सोबतच टेलिव्हिजन विश्वात काम केले आहे. बिग बॉसमध्ये देखील गौहर स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गांधी गोडसे : एक युद्ध’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित, चित्रपटात पाहायला मिळणार थरारक वैचारिक युद्ध
‘प्रभाससमोर ऋतिक रोशन काहीच नाही’, राजामौलींच्या वक्तव्यानंतर इंडस्ट्रीमध्ये खळबळ