Wednesday, June 26, 2024

गौरी खानचे हॉटेल व्यवसायात पदार्पण; रेस्टॉरंटला नाव दिलं Torri, जाणून घ्या इनसाईड स्टोरी

बॉलिवूडच्या किंग खानची पत्नी गौरी खान (Gauri Khan) सध्या चर्चेत आली आहे. नुकतचं तिनं हॉटेल व्यवसायात पदार्पण केले असुन एक नवं रेस्टॉरंट सुरु केलं आहे. बी टाऊनमध्ये सध्या फक्त आणि फक्त गौरीच्या रेस्टॉरंटची चर्चा पाहायला मिळत आहे. गौरीने हे रेस्टॉरंट मुंबईत ‘टोरी’ या नावाने सुरु केले आहे. तिनं आपल्या नव्या हॉटेलची झलक सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे रेस्टोरंटचे इंटिरिअरसोबत तिच्या रेस्टॉरंटच्या नावाची चर्चा अधिक रंगली आहे. अनेक चाहत्यांना टोरी म्हणजे काय असा प्रश्न पडला आहे. तर जाणून घेऊयात टोरी या नावाच नेमकां अर्थ काय?

गौरी खानने तिने पहिलं नवं रेस्टॉरंट मुंबईतील बांद्रा येथे सुरु केलं आहे. तिच्या या रेस्टोरंटचे इंटिरिअर हे अत्यंत सुंदर आहे. तिच्या हॉटेलच्या इंटिरिअरनं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. गौरीने तिच्या इंस्टग्रामवर रेस्टॉरंटचे काही फोटो शेअर केले आहेत. ‘माझे पहिले रेस्टॉरंट टोरी सर्वांसाठी सुरु झाले आहे’ अशी कॅप्शन तिनं तिच्या पोस्टला दिली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये गौरी पोज देताना दिसत आहे. खुप खुश आहे. पण तिच्या चाहत्यांना तिच्या रेस्टॉरंटच्या नावावरुन अनेक प्रश्न पडले आहेत.

टोरी हे नाव सर्च केले असता हा शब्द जापनीज असल्याचे समोर आले. या शब्दाचा अर्थ खुप सुंदर आहे. तोरी याचा अर्थ जापनीज भाषेत पक्षी असा होतो. तोरी किंवा टोरीचा तो एक प्रकार आहे. जपानी संस्कृतीत हे पक्षी प्रेम, नशीब आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

आजकाल अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी हे स्वत:चा नवा बिझनेसही सुरू करताना दिसत आहेत. त्यातून हॉटेलिंग क्षेत्रातही अनेकांनी उडी घेतली आहे. नुकतंच अभिनेत्री श्रेया बुगडे हिनं देखीर दादर भागात आपलं एक नवं रेस्टोरंट सुरू केलं आहे.

गौरी खान ही स्वत: इंटिरिअर डिझायनर आणि चित्रपट निर्मातीही आहे. तिनं अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली आहे. शाहरूखच्या अनेक चित्रपटांचीही तिनं निर्मिती केली आहे. बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय सेलिब्रेटींची घरंही तिनं सजवली आहेत. मुकेश अंबानी, रॉबर्टो कैवल्ली आणि राल्फ लॉरेन यांसारख्या श्रीमंतांची घर गौरी खानने डिझाईन केली आहेत. गौरी खानचे नाव फॉर्च्यून मॅगझीनमध्ये ५० शक्तीशाली महिलामध्ये समावेश झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून इंदिरा गांधी-नर्गिस दत्तचे नावं वगळले, जाणून घ्या नवीन बदल
घटस्फोटानंतरही किरण राव आमिरसोबत कम्फर्टेबल; म्हणाली, ‘आम्ही एकमेकांना चांगले समजतो’

हे देखील वाचा