‘माझा होशील ना’ फेम गौतमी देशपांडेच्या ग्लॅमरस लूकने चोरली लाखो मने; एक नजर टाकाच


अभिनेत्री गौतमी देशपांडे ही ‘माझा होशील ना’ या मालिकेद्वारे दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. प्रेक्षकही तिला बरेच प्रेम देतात. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष स्वतःकडे वेधत असते. नुकतेच तिने तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहे, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

हे फोटो गौतमीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यात चाहत्यांना तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला आहे. तुम्ही पाहू शकता की, फोटोमध्ये गौतमीने शाईनी सिल्व्हर रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यात तिची अप्रतिम सुंदरता झळकत आहे. तिने डायमंडचे ब्रेसलेट, रिंग आणि डायमंडचेच कानातले घालून हा ग्लॅमरस लूक पूर्ण केला आहे.

गौतमी कॅप्शनमध्ये म्हणतेय की, “मी जी स्त्री बनत, तिच्यावर मला विश्वास आहे.” तर दुसऱ्या फोटोला तिने, “गुड मॉर्निंग” असे कॅप्शन दिले आहे. चाहत्यांकडून गौतमीचे हे फोटो खूप पसंत केले जात आहेत. तिने हे फोटो पोस्ट करतात ते व्हायरल होऊ लागले होते. बघता बघताच फोटोने ३६ हजाराहून अधिक लाईक्स मिळवले आहेत. तसेच चाहते कमेंट करून तिचे कौतुक करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. (gautami deshpande shared her glamorous photos with good morning caption)

गौतमीबद्दल बोलायचे झाले, तर ती अभिनेत्रीसोबत गायिकाही आहे. ती प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. तिने २०१८ साली सोनी मराठी चॅनलवरील ‘सारे तुझ्याच साठी’ या मालिकेद्वारे टीव्हीवर पदर्पण केले होते. त्यानंतर ती आता ‘माझा होशील ना’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेमध्ये काम करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने केला लॉस एंजेलिसमधील आलिशान घरासोबतचा झक्कास फोटो शेअर; किंमत वाचून येईल चक्कर

-अदा शर्माचे विचित्र अंदाजातील फोटो व्हायरल; विचारला असा प्रश्न की, नेटकरीही झाले हैराण

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ


Leave A Reply

Your email address will not be published.